Banana Agrowon
ताज्या बातम्या

Tissue Culture Banana : उतिसंवर्धित केळी रोपांची मागणी अधिक, पुरवठा कमी

Banana Seedling : राज्यात उतिसंवर्धित केळी रोपांची मोठी मागणी यंदाही आहे. सुमारे साडेदहा कोटी केळी रोपांची विक्री यंदाही झाली असून, सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळी रोपांची लागवड झाली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : राज्यात उतिसंवर्धित केळी रोपांची मोठी मागणी यंदाही आहे. सुमारे साडेदहा कोटी केळी रोपांची विक्री यंदाही झाली असून, सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळी रोपांची लागवड झाली आहे. रोपांची मागणी अधिक व पुरवठा कमी अशी स्थिती आहे.

शेतकऱ्यांना आता बुकिंग किंवा आगाऊ नोंदणी केल्यास दीड महिन्यानंतर अनेक कंपन्यांकडून पुरवठा केला जात आहे.

जून, जुलैमध्ये लागवडीसाठी अनेक शेतकऱ्यांनी डिसेंबर व जानेवारी महिन्यात आगाऊ नोंदणी रोपे वितरक, विक्रेत्यांकडे करावी लागली होती. प्रतिरोप १४ ते १६ रुपये असे दर विविध कंपन्या आकारत आहेत. यातून कोट्यवधींची उलाढालदेखील होत आहे.

केळी रोपांची सर्वाधिक पाच कोटी रोपे एवढी लागवड खानदेशात केली जात आहे. यंदाही एवढीच लागवड आहे. जळगाव जिल्ह्यात सव्वाचार कोटी, धुळे व नंदुरबारात मिळून ९० लाख उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड झाली आहे. यापाठोपाठ सोलापूर, कोल्हापूर, पुणे व इतर भागात केळी रोपांची लागवड झाली आहे.

राज्यात केळीची ८४ हजार हेक्टरवर लागवड केली जाते. यंदाही ही लागवड एवढीच किंवा यापेक्षा अधिक असणार आहे. यातील सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळी रोपांची लागवड केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात २५ कंपन्या केळीच्या उतिसंवर्धित रोपांचा पुरवठा करतात. सुमारे सात कोटी रोपांचा पुरवठा राज्यात विविध कंपन्या करीत आहेत.

जळगावातील २० हजार हेक्टरवर रोपे

जळगाव जिल्ह्यात सव्वाचार कोटी केळी रोपांची विक्री मृग बहरात (जून, जुलैमध्ये लागवडीच्या बागा) लागवडीसाठी झाली आहे. त्यात एका कंपनीने साडेतीन कोटी व इतर कंपन्यांनी ७५ लाख केळीच्या उतिसंवर्धित रोपांचा पुरवठा केला. अर्थात सुमारे २० हजार हेक्टरवर केळीच्या रोपांची लागवड जळगावात झाली आहे.

रोपे लागवडीत वर्षागणिक वाढ

केळी रोपांची मागणी किंवा लागवड राज्यात वर्षागणिक वाढली आहे. पाच वर्षांपूर्वी उतिसंवर्धित रोपांची लागवड राज्यात १० ते १२ हजार हेक्टरवर केली जात होती. परंतु ही लागवड मागील चार वर्षांत दुप्पटीने वाढली आहे.

हेक्टरी ९० ते १०० टन केळीचे उत्पादन उतिसंवर्धित रोपांच्या बागेत नेटके व्यवस्थापन करून मिळते. केळी कंद लागवडीतून हे उत्पादन नेटके व्यवस्थापन करून हेक्टरी ६० ते ७० टन एवढे मिळते, यामुळे अनेक शेतकरी रोपांच्या लागवडीकडे वळले आहेत.

राज्यात उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड मागील पाच वर्षात अधिकची वाढली आहे. सुमारे साडेसहा ते सात कोटी रोपांची एकूण विक्री झाल्याचा अंदाज आहे. रोपांची मागणी अधिक असल्याने पुरवठा अधिकाधिक करण्यावर सर्वांचा भर आहे. यामुळे सहा महिन्यांपूर्वी आगाऊ नोंदणी शेतकऱ्यांना करण्याच्या सूचना होत्या.
- राहुल भारंबे, व्यवस्थापक, जैन उतिसंवंर्धित केळी रोपे विभाग, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage : अमरावती जिल्ह्यात आतापासूनच पाणीटंचाईची चाहूल

Crop Damage Compensation : नांदेडला नुकसानग्रस्तांचे ८१२ कोटी अडकले आचारसंहितेत

Sindhudurg Farmers : कापणी सोडाच; शेतात जायचीच इच्छा मेली, कृषी विभाग पंचनाम्यालाही आलं नाही

Devendra Fadnavis : सत्ता द्या, शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू, फडणवीस यांची घोषणा

Jayakwadi Canal : जायकवाडी डाव्या कालव्याच्या पाणी आवर्तनाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT