Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील चौदा मंडलांत अतिवृष्टी

Rain News : मराठवाड्यात बुधवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाचा जोर वाढल्याचे चित्र पाहायला मिलाले. मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १४ मंडलांत अतिवृष्टी झाली.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात बुधवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाचा जोर वाढल्याचे चित्र पाहायला मिलाले. मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १४ मंडलांत अतिवृष्टी झाली.

छत्रपती संभाजीनगर व लातूर जिल्ह्यांत पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. त्यापाठोपाठ नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड जिल्ह्यांतील काही भागांत पावसाची हजेरी मध्यम ते दमदार स्वरूपाची राहिली.

अतिवृष्टी झालेल्या मंडलांमध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील चार, लातूरमधील चार, जालना, बीड, हिंगोली, परभणीमधील प्रत्येकी एक व नांदेडमधील दोन मंडलांचा समावेश आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८३ पैकी ६२ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम दमदार, ते जोरदार पाऊस झाला. गंगापूर व वैजापूर तालुक्यांतील प्रत्येकी दोन मिळून चार मंडलांत अतिवृष्टी झाली. वैजापूर, खुलताबाद, कन्नड, गंगापूर तालुक्यांत मध्यम ते दमदार पाऊस झाला.

जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४६ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. जालना, भोकरदन, जाफराबाद, अंबड तालुक्यांत पावसाचा जोर मध्यम ते दमदार स्वरूपाचा राहिला.

जिल्ह्यातील अंबड तालुक्यांतर्गत येत असलेल्या गोंदी मंडलात अतिवृष्टी झाली. बीड जिल्ह्यातील ३९ मंडलांत पावसाची हजेरी लागली. तुरळक, हलका, मध्यम ते दमदार अशा स्वरूपात झालेला पाऊस जिल्ह्यातील पाली मंडलात अतिवृष्टी रूपात बरसला.

गेवराई, बीड तालुक्यांत पावसाची हजेरी मध्यम ते दमदार स्वरूपची राहिली. लातूर जिल्ह्यातील ६० पैकी ५९ मंडलांत पावसाची हजेरी लागली. देवणी तालुक्यातील तीनही मंडलांना पावसाने धो-धो धुतले. या तालुक्यात सरासरी ८३ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यातील चार मंडलांत अतिवृष्टी झाली. शिरूर अनंतमाळ, उदगीर, निलंगा, जळकोट या तालुक्यांमध्ये पावसाचा दोर मध्यम ते दमदार स्वरूपाचा राहिला. उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर नसल्याचे चित्र होते. या जिल्ह्यात पावसाची केवळ दहा मंडलांत लागलेली हजेरी तुरळक ते हलक्या स्वरूपाचीच होती.

आतापर्यंत २९ मंडलांत अतिवृष्टी

यंदाचा पाऊस आपल्या लहरीपणाचा सुरुवातीपासूनच परिचय देतो आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागांतील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. काही भागांत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. एक जूनपासून पाच जुलैपर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील २९ मंडलांमध्ये आतापर्यंत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे.

त्यामध्ये सर्वाधिक नऊ मंडळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून, त्या पाठोपाठ लातूरमधील पाच, बीड व नांदेडमधील प्रत्येकी चार, उस्मानाबाद, परभणी व जालनामधील प्रत्येकी दोन, तर हिंगोलीतील केवळ एका मंडलाचा समावेश आहे.

जिल्हानिहाय अतिवृष्टीची मंडळ

(पाऊस मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर

हरसूल ८३

डोणगाव ८५.२५

लासूरगाव ७०.२५

घायगाव ७०

जालना जिल्हा

गोंदी ७३.५०

बीड जिल्हा

पाली ७३.५०

लातूर जिल्हा

नागलगाव ७०.२५

मोघा ८४

देवरंजन ६७

बोरोळ १३२.५०

नांदेड जिल्हा

इस्लापूर ११३.५०

देहली ९९.७५

परभणी जिल्हा

परभणी ११३.७५

हिंगोली जिल्हा

नंदापूर ८०.२५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT