Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : साठ मंडलांत पावसाची जोरदार हजेरी

चार-पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात गुरुवारी (ता. ५) रात्री जोरदार पाऊस झाला.

टीम ॲग्रोवन

नगर : चार-पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात गुरुवारी (ता. ५) रात्री जोरदार पाऊस (Heavy Rainfall) झाला. या पावसामुळे मुळा धरणातून (Mula Dam) बंद केलेला पाणी विसर्ग पुन्हा सुरू केला आहे. शुक्रवारी (ता. ७) दुपारी २ हजार १७० क्युसेकने विसर्ग सुरू होता.

सीना नदीतूनही १ हजार क्युसेकने विसर्ग सुरू असल्यामुळे नदीला पूर आला होता. नगर जिल्ह्यातील नेवासा, नगर, श्रीगोंदा, जामखेड, पाथर्डी, पारनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, शेवगाव तालुक्यांत गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाला. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६५ महसूल मंडलांत जोरदार पाऊस झाल्याची नोंद आहे.

मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे सोयाबीन, बाजरी, कापूस, तूर आदी खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांत शेतात पाणी साचून राहिल्याने पिके सडली आहे. त्याचे अजून पंचनामे नाहीत, त्यात पुन्हा रात्री जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी हतबल झाले आहे.

गुरुवारी रात्री नालेगाव, सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागापूर, जेऊर, चिचोंडी, वाळकी, चास, पारनेर, बेलवंडी, सुपा, श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, पेंडगाव, चिंभळा, देवदैठण, कोळगाव, कर्जत, राशीन, भांबोरी, कुंभळी, मिरजगाव, माही जळगाव, जामखेड, अरणगाव, खर्डा, नान्नज, नायगाव,

शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव, एरंडगाव, पाथर्डी, माणिकदौडी, टाकळी, कोरडगाव, कंरजी, मिरी, नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, सलाबतुपुर, कुकाणा, चांदा, घोडेगाव, सोनई,वडाळा, राहुरी, सात्रळ, टाकळीभान, देवळाली, टाकळीमिया, ब्राह्मणी, वांबोरी, बाभळेश्‍वर या महसूल मंडलांत जोरदार पाऊस झाला. पावसामुळे मुळा धरणातून पाणी विसर्ग सुरू केला. सीना धरणातूनही १ हजार क्युसेकने पाणी सीना नदीत वाहत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT