Rain Agrowon
ताज्या बातम्या

Kinwat Rain Update : किनवट, माहूर तालुक्यांत पावसाचा जोर; दोन मंडलांत अतिवृष्टी

Kinwat Monsoon News : मागील एका महिन्याच्या अधिक कालापासून दडून बसलेल्या पावसाने मंगळवारी (ता. ४) समाधानकारक सुरुवात केली.

Team Agrowon

Nanded News : मागील एका महिन्याच्या अधिक कालापासून दडून बसलेल्या पावसाने मंगळवारी (ता. ४) समाधानकारक सुरुवात केली. हा पाऊस जिल्ह्याच्या किनवट आणि माहूर तालुक्यात जोरदार झाला यामुळे किनवटमधील दोन मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. मागील २४ तासांत जिल्ह्यात १९.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या सूत्राने दिली.

नांदेड जिल्ह्यात जून महिन्यामध्ये केवळ ३० टक्केच पाऊस झाला होता. यामुळे खरिपातील पेरण्या रखडल्या होत्या. जून संपूनही जुलैच्या तीन तारखेपर्यंत पाऊस तुरळकच होता. परंतु चार तारखेला जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. मंगळवारी हा पाऊस जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत झाला. यात प्रामुख्याने किनवट, माहूर व मुखेड तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता.

यामुळे किनवट तालुक्यातील इस्लापूर मंडलात ११३.५० मिलिमीटर, तर दहेली मंडलात ९९.७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यामुळे या ठिकाणी अतिवृष्टी नोंदली गेली आहे. या पावसामुळे जिल्ह्यात रखडलेल्या पेरण्यांना सुरुवात झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिलाली. परंतु जिल्ह्यातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही.

यामुळे शेतकऱ्यांनी शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मंगळवारी झालेला पाऊस मुखेड तालुक्यातील येवती मंडलात ६२.५ मिलिमीटर, जाहूर ६२.५, बाऱ्हाळी ५७.८, मुक्रमाबाद ३६.५, सिंदखेड ३२, तामसा ३६, माहूर ५१, मांडवा ४३, जलधारा ४२, वाई ३५, शिंदगी ३५, उमरी बाजार ३९, किनी ४८.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तालुकानिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

नांदेड ९.४०, बिलोली १३.४० मुखेड ४२, कंधार १३, लोहा १२.८०, हदगाव १५, भोकर २३.४०, देगलूर २.४०, किनवट ४८.७०, मुदखेड १४.५०, हिमायतनगर २५, माहूर ३८.७०, धर्माबाद ६.६०, उमरी चार, अर्धापूर १३.२०, नायगाव ३.४० मिलिमीटर. चोवीस तासांतील सरासरी १९.१० मिलिमीटर. आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७१.१० मिलिमीटर वार्षिक सरासरीच्या आठ टक्के पाऊस बंद झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT