Rain Update Pune  Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : पावसाचा दणका सुरूच

जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात पावसाचा दणका सुरूच आहे. वळवण, लोणावळा, ठोकरवाडी, शिरोटा या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसत आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात पावसाचा दणका (Rainfall In Pune) सुरूच आहे. वळवण, लोणावळा, ठोकरवाडी, शिरोटा या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस (Heavy Rain On Ghatmatha) बरसत आहे. गुरुवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये वेल्ह्यात १७८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर अनेक भागात पावसाची संततधार सुरूच असल्याने शेताशेतात (Paddy Farm) पाणी साचले असल्याने पिकांच्या नुकसानीत (Crop Damage) वाढ होऊ लागली आहे.

पश्‍चिम पट्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव तालुक्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मावळातील लोणावळा येथे दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. १०) १५५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर कार्ला येथे ११९ मिलिमीटर पाऊस झाला असून वडगाव मावळ ९४, तळेगाव ८१, काले ९३, खडकाळा ५३, शिवणे ५३ मिलिमीटर, मुळशीतील माले आणि मुठे येथे १३४ मिलिमीटर पाऊस पडला. तर पौड येथे ५०, घोटावडे ३८, थेरगाव ३०, पिरंगुट ५२ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे धरणातील पाण्यामध्ये वेगाने वाढ होत असून अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत आहे.

हवेलीतील खेड येथे ५१ मिलिमीटर पाऊस पडला. तर पुणे वेधशाळा १५, केशवनगर १५, कोथरूड ३७, खडकवासला २१, भोसरी १७, चिंचवड १३, कळस १४ मिलिमीटर, तर थेऊर, उरुळीकांचन, हडपसर, वाघोली भागांत तुरळक सरी पडल्या. भोर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. तालुक्यातील भोलावडे ८२, नसरापूर ७१, किकवी २९, वेळू ४२, आंबवडे ३०, संगमनेर ४९, निगुडघर ९०, भोर २१ मिलिमीटर, वेल्ह्यातील पाणशेत ८०, विंझर ८९, आंबवणे ८६ खेडमधील वाडा ३५, राजगुरुनगर १३, कुडे ३३, पाईट १३, चाकण १९, आळंदी १७, पिंपळगाव १७, कन्हेरसर १८, कडूस १३ मिलिमीटर पाऊस पडला.

जुन्नरमधील डिंगोरे येथे २१, आपटाळे १३ मिलिमीटर तर जुन्नर, नारायणगाव, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, राजूर, ओतूर भागात हलक्या सरी कोसळल्या. आंबेगावमधील घोडेगाव १३, आंबेगाव ५४, पारगाव २४ मिलिमीटर, तर कळंब, मंचर भागात तुरळक सरी पडल्या. शिरूरमधील पाबळ येथे १३ मिलिमीटर तर टाकळी, वडगाव, न्हावरा, मलठण, तळेगाव, रांजणगाव, कोरेगाव,, शिरूर बारामतीतील बारामती, माळेगाव, पणदरे, वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव, उंडवडी, इंदापुरातील भिगवण, इंदापूर, लोणी, बावडा, काटी, निमगाव, अंथुर्णी, सणसर, दौंडमधील देऊळगाव, पाटस, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, रावणगाव, दौंड भागात पावसाचा शिडकावा झाला. पुरंदरमधील सासवड येथे १२ मिलिमीटर तर भिवंडी, कुंभारवळण, जेजुरी, परिंचे, राजेवाडी, वाल्हा भागात तुरळक सरी बरसल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT