Onion Crop damage Agrowon
ताज्या बातम्या

Onion Crop Damage : अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान

मंगरूळपीर तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Washim News मंगरूळपीर तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. या तालुक्यातील तपोवन येथे दिडशे एकरावर शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केलेली असून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. शेतकऱ्यांना मदत दिली जावी अशी मागणी तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन पाठवत केली.

प्रशासनाने दखल का घेतली नाही, असा प्रश्न तपोवन येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदारांजवळ केला. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्यात यावी अशा मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली.

यावेळी नीलेश येवले, संदीप येवले, दिलीप येवले, उमेश येवले, डिगांबर बाईस्कार, महेश येवले, अमोल येवले, रोशन येवले, योगेश येवले, संतोष येवले, गजानन बाईस्कार, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन सुर्वे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

Wetland Ecosystems: पाणथळ सृष्टी व्यवस्थेचे विश्व

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

Spider Mite Issue: वांग्यावरील लाल कोळीची समस्या

Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती

SCROLL FOR NEXT