Summer Heat Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्यात उन्हाचा चटका कायम

राज्यात थंडीचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला असतानाच, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.

Team Agrowon

Summer Weather Update पुणे : राज्यात थंडीचा हंगाम (Winter Season) अखेरच्या टप्प्यात आला असतानाच, उन्हाळ्याची चाहूल (Summer) लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा चटका (Heat) चांगलाच वाढला आहे.

विदर्भात उन्हाची (Heat Weather In Vidarbh) ताप अधिक आहे तर उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. आज (ता. २६) कमाल व किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सुर्य तळपल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्याच्या उन्हाची ताप चांगलीच वाढली आहे. शनिवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे ३८.१ अंश तापमानाची नोंद झाली.

विदर्भातील ब्रह्मपूरी, वाशीम, अमरावती, वर्धा, तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि मराठवाड्यातील नांदेड येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तर सांगली, रत्नागिरी, परभणी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर येथे ३६ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले.

राज्याच्या किमान तापमानात सातत्याने वाढ असली तरी उत्तर महाराष्ट्रात मात्र गारठा कायम आहे. तर उर्वरित राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत आहेत.

शनिवारी (ता. २५) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी ८.६ अंश सेल्सिअस, जळगाव येथे ९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा १२ अंशांच्या पुढे होता. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.२ (१२.५), जळगाव ३५.४ (९.७), धुळे ३५.०(११.०), कोल्हापूर ३४.८ (१९.९), महाबळेश्वर ३१.८ (१६.९), नाशिक ३५.० (१३.६), निफाड ३५.४(८.६), सांगली ३६.२ (१८.१), सातारा ३५.१ (१५.५), सोलापूर ३७.६ (१८.६),

सांताक्रूझ ३६.० (२०.४), डहाणू ३०.७ (१८.९), रत्नागिरी ३६.६ (२०.१), छत्रपती संभाजीनगर ३५.५ (१२.६), नांदेड ३७.२ (१७.०), परभणी ३६.७(१५.३), अकोला ३८.१ (१५.५), अमरावती ३७.०(१७.७), बुलढाणा ३४.६(१७.८),

ब्रह्मपूरी ३७.९ (१७.४), चंद्रपूर ३६.२ (१७.०), गडचिरोली ३३.६(१५.०), गोंदिया ३६.० (१५.४), नागपूर ३६.३ (१५.६), वर्धा ३७.०(१७.५), वाशीम ३७.६ (१६.०), यवतमाळ ३४.५ (१७.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Sales Decline : सप्टेंबरमध्ये ट्रॅक्टरची विक्री घटली; एल निनोमुळे मागणीवर दबाव

Meat Quality Testing: मांस, पशुजन्य उत्पादन गुणवत्ता तपासणीची गरज

Agriculture Success Story: सामान्य शेतकरी ते प्रगतिशील, मार्गदर्शक शेतकरी

Vegetable Farming: भाजीपाला शेतीतूनच झाली मेथे कुटुंबाची उन्नती

Joyful Learning: आनंदाचा दिवस की आनंददायी शिक्षण

SCROLL FOR NEXT