Heat Wave Agrowon
ताज्या बातम्या

Heat Wave : कोकणात उष्ण लाट; विदर्भात पावसाचा अंदाज

उन्हाचा चटका वाढल्याने कोकणात उष्णतेची लाट आली आहे. यातच राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होऊ लागले आहे.

Team Agrowon

Weather Update पुणे : उन्हाचा चटका (Heat) वाढल्याने कोकणात उष्णतेची लाट आली आहे. यातच राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होऊ लागले आहे.

आज (ता. ११) कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तर विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज (Rain Forecast) आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका कमी झाला होता. मात्र राज्यात अंशतः ढगाळ हवामान असले तरी उन्हाचा चटका वाढू लागला आहे.

शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ येथे राज्यातील उच्चांकी ३९.९ अंश तापमानाची नोंद झाली.

तर रत्नागिरी येथे ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने दोन्ही उष्णतेची लाट आली आहे. किनारपट्टीय भागामध्ये तापमान ३७ अंशांच्या पुढे असेल आणि तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांनी वाढ झाल्यास उष्णतेची लाट समजली जाते.

विदर्भातील ब्रह्मपूरी येथेही ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३४ ते ३६ अंशांच्या दरम्यान होते.

रात्रीच्या किमान तापमानातही चढ-उतार सुरू आहेत. उत्तर महाराष्ट्राच्या निफाड येथील गहु संशोधन केंद्रात १० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

दरम्यान, वायव्य मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर प्रदेशापासून मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. ११) विदर्भात वादळी वारे, विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणात मात्र उन्हाचा चटका कायम राहून, उष्ण लाट येण्याचा इशारा कायम आहे.

शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.३ (१५.८), जळगाव ३५.० (१५.२), धुळे ३४.० (१२.०), कोल्हापूर ३३.७ (२०.५), महाबळेश्वर २७.२ (१६.९), नाशिक ३२.८ (१३.८), निफाड ३४.२(१०.०), सांगली ३४.६ (१९.८), सातारा ३३.८ (१८.४), सोलापूर ३५.८ (२०.६),

सांताक्रूझ ३७.९ (२१.८), डहाणू ३४.८ (२२.४), रत्नागिरी ३७.२ (२३.४), छत्रपती संभाजीनगर ३२.७ (१३.२), नांदेड ३३.८ (२०.०), परभणी ३५.०(१९.५), अकोला ३५.८ (१६.४), अमरावती ३५.८(१७.७), बुलढाणा ३३.०(१८.०),

ब्रह्मपूरी ३७.८ (१९.५), चंद्रपूर ३६.२ (१८.०), गडचिरोली ३४.२(१६.४), गोंदिया ३४.५ (१७.५), नागपूर ३४.८ (१७.८), वर्धा ३५.९(२०.२), वाशीम ३५.६ (१७.४), यवतमाळ ३५.७ (१७.७).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Cylinder Supply Issue: ‘उज्ज्वला’च्या डोईवर पुन्हा सरपण

Tur Farming: तूर लागवडीसाठी निवडा योग्य वाण

Farmer Conflict Resolution: अडीच महिन्यात मिटवली ६६३ बांधांची भांडणं

Brazil Cooperative Model: ब्राझीलमधील सहकारी संस्थांची व्यावसायिकता

Farmers Protest: धनगाव येथे कर्जमाफी आदेशाची होळी

SCROLL FOR NEXT