Heat Wave Agrowon
ताज्या बातम्या

Heat Wave : कोकणात उष्णतेची लाट कायम

उन्हाचा चटका कायम असल्याने कोकणात उष्णतेची लाट टिकून आहे. यातच राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होऊ लागले आहे.

Team Agrowon

Weather Update पुणे : उन्हाचा चटका (Heat) कायम असल्याने कोकणात उष्णतेची लाट (Heat Wave) टिकून आहे. यातच राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होऊ लागले आहे.

राज्यात उद्यापासून (ता. १३) वादळी पावसाची शक्यता असून, आज (ता. १२) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज (Rain Forecast) आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह (Cloudy Weather) कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून, उन्हाचा चटकादेखील वाढला आहे. किनारपट्टी भागामध्ये तापमान ३७ अंशांच्या पुढे असेल आणि तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांनी वाढ झाल्यास उष्णतेची लाट समजली जाते. शनिवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी ३७.५ अंश तापमानाची नोंद झाली.

तर रत्नागिरी येथे ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने दोन्ही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३४ ते ३६ अंशांच्या दरम्यान होते. रात्रीच्या किमान तापमानातही चढ-उतार सुरू आहेत.

दरम्यान, पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर बिहारपासून छत्तीसगड, विदर्भ, तेलंगणा ते कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने आजपासून (ता. १२) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर आज (ता. १२) उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

शनिवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३३.८ (१४.७), जळगाव ३५.६ (१५), धुळे ३४ (१२.५), कोल्हापूर ३४.१ (२०.२), महाबळेश्‍वर २९.१ (१६.८), नाशिक ३२.७ (१६.२), निफाड ३३.४ (१२.५), सांगली ३४.९ (१९.८), सातारा ३४.७ (१७.५), सोलापूर ३६.२ (२१.४),

सांताक्रूझ ३७.५ (२३), डहाणू ३१.३ (२१.३), रत्नागिरी ३७.४ (२१.७), छत्रपती संभाजीनगर ३३.२ (१५.२), नांदेड ३५.२ (२०), परभणी ३५.३ (१९.४), अकोला ३६.२ (१७.६), अमरावती ३६.२ (१९.३), बुलडाणा ३३.२ (१९.२),

ब्रह्मपुरी ३६.९ (१९.८), चंद्रपूर ३६ (२०), गडचिरोली ३६ (१६.६), गोंदिया ३४.२ (१६.४), नागपूर ३४.४ (१६.८), वर्धा ३५.४ (१९.८), वाशीम ३६.२ (१७.८), यवतमाळ ३५ (१८).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Dharwad Method: तूर लागवडीची धारवाड पद्धत, हेक्टरी उत्पादन थेट २५-२६ क्विंटलपर्यंत!

Inspirational Story: गावाच्या पाणी प्रश्‍नासाठी झगडणारा सुनील

Crop Damage Compensation GR: चार जिल्ह्यांतील २२ हजार शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील 'अवकाळी'च्या नुकसानीपोटी १६ कोटी मदत मंजूर

Krishna River: कृष्णा नदीत रविवारपर्यंत उपसाबंदी

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

SCROLL FOR NEXT