Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Hailstorm Forecast : उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीचा इशारा

राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात सोमवारी हलक्या सरींना शिडकावा केला आहे.

Team Agrowon

Weather Update पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात सोमवारी हलक्या सरींना (Rainfall) शिडकावा केला आहे. आजपासून (ता. १५) राज्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. उत्तर महाराष्ट्रात, मराठवाड्यात गारपिटीचा (Hailstorm) इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात ढगाळ हवामान होत असले तरी, कमाल तापमान कमी-अधिक होत आहे. कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे असल्याने, तसेच तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांनी वाढ झाल्याने सांताक्रुझ आणि रत्नागिरी येथे गेले काही दिवस उष्णतेची लाट कायम होती.

मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ येथे देशातील उच्चांकी ३७.४ अंश, तर रत्नागिरी येथे ३७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३४ ते ३८ अंशांच्या दरम्यान होते. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे.

दक्षिण अंतर्गत कर्नाटक ते कोकण पर्यंत समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. झारखंड ते तेलंगणा दरम्यान आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यातच बंगालच्या उपसागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टा यांच्या एकत्र प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण झाले आहे.

यामुळे पोषक हवामान झाल्याने आज (ता. १५) राज्याच्या विविध भागात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गारपिट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तर कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.७ (१६.८), जळगाव ३७.७ (२२.५), धुळे ३७.० (१७.०), कोल्हापूर ३४.६ (२०.७), महाबळेश्वर २९.३ (१७.१), नाशिक ३४.० (१७.४), निफाड ३५.१(१४.८), सांगली ३५.७ (१९.०), सातारा ३४.५ (१७.६),

सोलापूर ३७.४(१८.९), सांताक्रूझ ३७.४ (२५.५), डहाणू ३५.१ (२६.०), रत्नागिरी ३७.३ (२१.८), छत्रपती संभाजीनगर ३४.४ (१७.१), नांदेड ३६.४ (२०.०), परभणी ३५.२(१९.०), अकोला ३८.२ (२१.२), अमरावती ३८.२(२०.३),

बुलढाणा ३६.०(२०.६), ब्रह्मपूरी ३८.८ (२०.६), चंद्रपूर ३८.० (२१.६), गडचिरोली ३५.४(१६.०), गोंदिया ३६.५ (१८.४), नागपूर ३६.४ (१९.२), वर्धा ३७.५(२०.९), वाशीम ३६.८ (२०.०), यवतमाळ ३६.५ (१९.७).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढतेय

Modern Farming Techniques: शेतकऱ्यांनी जाणले संत्रा-कापूस पिकाचे तंत्रज्ञान

Agriculture Department Inspection: खत-बियाणे विक्रेत्यांना दणका

Rainfall Sowing Advisory: मॉन्सूनपूर्व पावसावर पेरणीची घाई करू नये : दत्तकुमार कळसाईत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, ३४४ कोटी निधी मंजूर

SCROLL FOR NEXT