Hailstorm  Agrowon
ताज्या बातम्या

Hailstorm Forecast : उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा

वाढलेल्या उन्हाचा चटक्यामुळे कोकणात उष्णतेची लाट कायम आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने आजपासून (ता. १४) राज्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे.

Team Agrowon

Weather Update पुणे : वाढलेल्या उन्हाचा चटक्यामुळे कोकणात उष्णतेची लाट (Heat Wave) कायम आहे. पावसाला पोषक हवामान (Favorable weather For Rain) असल्याने आजपासून (ता. १४) राज्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे.

तर उद्यापासून (ता. १५) उत्तर महाराष्ट्रात, मराठवाड्यात गारपिटीचा (Hailstorm Forecast) इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात ढगाळ हवामान होत असले तरी, उन्हाचा चटका कायम आहे. कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे असल्याने, तसेच तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांनी वाढ झाल्याने सांताक्रुझ आणि रत्नागिरी येथे उष्णतेची लाट कायम होती.

सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ येथे देशातील उच्चांकी ३९.४ अंश, तर रत्नागिरी येथे ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३४ ते ३८ अंशांच्या दरम्यान होते. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे.

पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर बिहारपासून दक्षिण अंतर्गत कर्नाटक पर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.

मात्र राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.

यामुळे पोषक हवामान झाल्याने आजपासून (ता. १४) राज्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

उद्यापासून (ता.१५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणातील काही जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.७ (१६.३), जळगाव ३७.२ (१७.७), धुळे ३५.५ (१३.०), कोल्हापूर ३४.० (२१.६), महाबळेश्वर २८.८ (१७.३), नाशिक ३४.२ (१८.८), निफाड ३४.६(१२.२), सांगली ३४.७ (२१.०), सातारा ३४.६ (१८.७),

सोलापूर ३६.२(२१.६), सांताक्रूझ ३९.४ (२४.६), डहाणू ३३.९ (२४.४), रत्नागिरी ३८.० (२३.९), छत्रपती संभाजीनगर ३४.८ (१६.६), नांदेड - (२०.२), परभणी ३५.७(१९.०), अकोला ३७.९ (१९.४), अमरावती ३७.२(२०.३),

बुलढाणा ३४.८(२०.०), ब्रह्मपूरी ३८.० (१९.५), चंद्रपूर ३७.२ (२०.४), गडचिरोली ३४.२(१६.४), गोंदिया ३६.२ (१७.०), नागपूर ३५.७ (१८.९), वर्धा ३६.५(२०.०), वाशीम ३३.२ (२१.०), यवतमाळ ३६.२ (१९.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT