Sunflower sowing Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : खानदेशात भुईमूग, सूर्यफूल पेरणी वाढणार

Sunflower Sowing : नदेशात यंदा सूर्यफूल व भुईमुगाची पेरणी वाढेल, असे संकेत आहेत. यामुळे सूर्यफूल बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा सूर्यफूल व भुईमुगाची पेरणी वाढेल, असे संकेत आहेत. यामुळे सूर्यफूल बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

भुईमुगाचे बियाणे बाजारात दाखल झाले आहे. सूर्यफुलाचे बियाणेदेखील मुबलक आहे, असा दावा कृषी विभाग करीत आहे. रब्बीतही भुईमूग, सूर्यफुलाची पेरणी बऱ्यापैकी झाली होती. काही तेलबियांचे दर टिकून आहेत.

तेलबियांना उठावदेखील आहे. सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा तेजी येत आहे. तसेच भुईमूग, सूर्यफुलाचे दरही टिकून आहेत. रब्ब्बीत भुईमुगाचे एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन अनेक शेतकऱ्यांना आले. त्याचे दरही बऱ्यापैकी मिळाले. तसेच सूर्यफुलाचे उत्पादनदेखील एकरी २० ते २२ क्विंटल एवढे आले.

त्याचे दरही प्रतिक्विंटल सहा हजारांपर्यंत मिळाले. यामुळे शेतकरी सूर्यफूल पेरणीकडे वळले आहेत. खानदेशात यंदा भुईमुगाची मिळून पाच हजार हेक्टरवर तर सूर्यफुलाचीदेखील सुमारे अडीच ते तीन हजार हेक्टरवर पेरणी होईल.

सातपुडा पर्वत भागात ही पेरणी अधिक असणार आहे. जलसाठेही मुबलक आहेत. अनेक शेतकरी पाऊस न आल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून ठिबकवर भुईमूग पेरणीचे नियोजन करीत आहेत.

काही शेतकरी तुषार सिंचनाचा उपयोग करून भुईमूग लागवडीचे नियोजन करीत आहेत. त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील पाल (ता. रावेर), ममुराबाद (ता. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रदेखील पुढाकार घेत आहेत.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारमध्ये तळोदा, शहादा भागात भुईमूग लागवड वाढेल, असे संकेत आहेत. तर सूर्यफुलाची पेरणी सर्वत्र कमी अधिक क्षेत्रात होईल. सूर्यफूल बियाण्यांचा काळाबाजारही सुरू आहे. सूर्यफूल बियाणे विक्री वाजवी दरात व्हावी. कारण शेतकरी ज्या वेळी बाजारात बियाण्यासाठी जातात,त्या वेळी त्याचे दर वधारतात किंवा कृत्रीम टंचाई तयार होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT