Grape Season Agrowon
ताज्या बातम्या

Grape Season : जानेवारीपासून द्राक्ष हंगामाला गती येणार

सध्या द्राक्षाला पोषक असे वातावरण असून बागा निकोप असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे. यंदाच्या हंगामात दर अपेक्षित मिळतील अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

टीम ॲग्रोवन

सांगली ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम (Grape Season) सुरू झाला असला तरी, अद्यापही हंगामाला गती आली नाही. जानेवारी महिन्यापासून हंगामाला गती येण्‍याची शक्यता द्राक्ष उत्पादक (Grape Farmer) शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या द्राक्षाला पोषक असे वातावरण असून बागा निकोप असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे. यंदाच्या हंगामात दर (Grape Rate) अपेक्षित मिळतील अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात यंदा फळ छाटणीच्या पूर्वी नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. त्यामुळे यंदा फळ छाटणी विलंबाने सुरू झाली. परंतु फळ छाटणीनंतरही परतीच्या पावसाने हजेरी लावली असल्याने काही प्रमाणात द्राक्षाचे नुकसान झाले. परंतु बागेवर डाऊनी, करपा यासारख्या रोगांचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी बागांना पेपर आच्छादन केल्या, त्या बागेतील द्राक्षाची काढणी सुरू झाली आहे. परंतु इतर भागातील फळ काढणी अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यात दाखल झाले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी वाढती थंडी आणि धुके यामुळे द्राक्ष घडामध्ये पाणी साचून नुकसान होईल, अशी भीती निर्माण झाली होती. परंतु त्यानंतर वातावरणात बदल झाल्याने नुकसान टळले आहे.

सध्या बागेला पोषक असे वातावरण असल्याने बागा चांगला आहेत. मिरज, कवठेमहांकाळ तालुक्याच्या पूर्व भागात काही प्रमाणात द्राक्षाची काढणी सुरू झाली आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांत द्राक्ष खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने व्यापारी दाखल होतील. जानेवारी महिन्यापासून हंगामास गती येईल. जिल्‍ह्यातील गेल्या तीन ते चार वर्षांपासून द्राक्षाची निर्यात देखील वाढली आहे. त्यामुळे यंदाही द्राक्षाची निर्यात वाढण्याची शक्यता आहे. द्राक्षाची निर्यात करण्यासाठी नोंदणीही लवकरच सुरू होईल.

यंदा फळ छाटणीच्या दरम्यान पावसाचे संकट आले. परंतु त्यातून नियोजन करत बागा उत्तमरीत्या साधल्या आहेत. सध्या पोषक वातावरण असल्याने बागा निरोगी आहेत.

- निलेश माळी, द्राक्ष उत्पादक शेतकरी, सावळज, ता. तासगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT