Primary Health Centre Agrowon
ताज्या बातम्या

Primary Health Centre : किन्हवलीला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या

किन्हवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची भेट घेऊन निवेदन दिले.

Team Agrowon

किन्हवली : किन्हवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास (Primary Health Centre) ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची भेट घेऊन निवेदन दिले.

शहापूर तालुक्यातील साधारण ४० गाव-खेड्यांसाठी महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या किन्हवली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची नव्याने प्रशस्त व सुसज्ज अशी इमारत साकारली आहे. या आरोग्य केंद्रांतर्गत खरीवली (सो), अस्नोली, मुगाव व अल्याणी उपकेंद्रांचा समावेश होतो. दुर्गम भागातील या आरोग्य केंद्रावर अवलंबून असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. आरोग्य केंद्राचा दर्जा असल्यामुळे येथे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे.

किन्हवली आरोग्य केंद्रापासून शहापूरचे उपजिल्हा रुग्णालय सुमारे २७ किलोमीटर अंतरावर आहे. रात्री-अपरात्री गरोदर माता, अपघातग्रस्त, विंचू व सर्पदंश रुग्ण तसेच आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होते. ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे म्हणून किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा, अशी मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची नुकतीच मंत्रालयातील दालनात भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे मागणी केली.

२०१७ पासूनच्या मागणीकडे दुर्लक्ष

यापूर्वी ऑक्टोबर २०१७ ला कोकण विभाग पत्रकार संघाने तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे यांनी २०२० मध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली होती.

ठाणे जिल्हा परिषदेच्या किन्हवली गटाच्या सदस्या कांचन साबळे यांनीही सर्वसाधारण सभेत किन्हवली आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा असा ठराव करून घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT