Agriculture Drone Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Drone : शासन ‘ड्रोन शेती’च्या प्रसारासाठी प्रयत्न करणार

महाराष्ट्र शासन ड्रोन शेतीच्या प्रचारासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणार आहे, असे आश्‍वासन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

टीम ॲग्रोवन

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkri) यांनी ड्रोन तंत्रज्ञानाच्या (Drone Technology) माध्यमातून महाराष्ट्रातील शेतीमध्ये तुषार क्रांती (Sprinkler) घडवून आणण्याचे अभिवचन दिले आहे. महाराष्ट्र शासन ड्रोन शेतीच्या (Drone Farming) प्रचारासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणार आहे, असे आश्‍वासन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिले.

‘वनामती व अॅग्रो व्हिजन’मार्फत वनामती सभागृहात ‘शेतीसाठी ड्रोनचे महत्त्व’ या विषयावर एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमनी मिश्र, आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, ॲग्रो व्हिजनचे सी. डी. माई, रवी बोरटकर, रमेश मानकर, डॉ. गोरंटीवार, श्रीधरराव ठाकरे उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या मार्गदर्शनात ‘ड्रोन शेती’ संदर्भात राज्य शासन बँक सबसिडी, पायलट ट्रेनिंग, समूह शेती गटाला यासाठी कर्ज व्यवस्था, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातून या ‘स्टार्टअप’ उद्योगाला मान्यता देण्याचा मसुदा लवकरच तयार करेल. कृषी मंत्रालयाच्या या मसुद्याला राज्य शासनाची मान्यता घेऊन नवी दिल्ली येथे केंद्रीय विविध संघटनांसोबत चर्चेसाठी सादर करण्यात येईल, अशी ग्वाही या वेळी कृषिमंत्र्यांनी दिली.

‘ड्रोन शेती’ तंत्रज्ञान हे अतिशय उत्तम तंत्रज्ञान असून, या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात फायदेशीर शेती करणे आवश्यक आहे. फवारणीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विषबाधा होते. ‘ड्रोन तंत्रज्ञान’ यावर मात करणे सहज शक्य आहे. त्यामुळे या संदर्भात अतिशय गांभीर्याने प्रयत्न करू, असे त्यांनी या वेळी सांगितले.

ड्रोन शेतीमुळे रोजगारनिर्मिती : गडकरी

जगामधल्या प्रगत ‘स्प्रिंकल टेक्नॉलॉजी’चा वापर यामध्ये करण्यात आला आहे. विदर्भ मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आता समूह शेतीला पाठबळ मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये ड्रोन शेतीमुळे रोजगारनिर्मिती होईल. महाराष्ट्र शासनाने लघू मध्यम व सूक्ष्म रोजगार मंत्रालयामार्फत या प्रकल्पाला कर्ज उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून साधारणतः आठ लाखांपर्यंत किंमत असलेल्या या ‘ड्रोन’ला सहज कर्ज उपलब्ध होईल व या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये होईल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. त्यांनी या वेळी उसासाठी हार्वेस्टरची योजना तयार करण्यात यावी, अशी सूचना केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT