Ajit Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Ajit Pawar : इथेनाॅल उत्पादनासाठी सरकार मदत करणार ; अजित पवार यांची साखर आयुक्तांशी बैठक

Ajit Pawar Meeting: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज साखर आयुक्तांबरोबर बैठक घेतली. यावेळी राज्यातील साखर कारखान्यांतील इथेनाॅल उत्पादनावर चर्चा झाली.

Team Agrowon

Sugar Factory : राज्यातील साखर कारखान्यांचा गळित हंगाम या काही महिन्यात सुरू होईल. कारखान्यात अतिरिक्त साखर उत्पादित झाल्यास त्याचे काय करायचे हा प्रश्न उपस्थित होतो. अनेक कारखाने त्यामुळे अडचणीत येत असतात. पण इथेनॉल निर्मितीने त्यांचा हा प्रश्न सुटू शकतो. यासाठी इथेनाॅल उत्पादनासाठी सरकार मदत करणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सकाळी पुण्यात साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील साखर कारखान्यांच्या प्रश्नांसह इथेनॉल निर्मितीबाबत चर्चा केली.

तसेच पवार यांनी शिरूरमधील घोडगंगा साखर कारखान्याच्या संपाबाबत कारखाना व्यवस्थापक आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या बैठकीनंतर पवार शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जेजुरीकडे रवाना झाले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह रविवारी पुण्यात होते. बहुराज्यीय सहकारी संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी सहकारी साखर कारखान्यांना उभारी देण्यासाठी केंद्र सरकार तत्पर असल्याचे सांगितले.

साखर आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवार म्हणाले, मागील हंगामात राज्यात ३०० कोटी तर देशात ८०० कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्राने सहा टक्के व्याज अनुदानाची योजना यासाठी आणल्याने यंदा इथेनॉल निर्मिती करण्यासाठी कारखाने अधिक प्रमाणात तयार होणार आहेत. हे इंधनच पुढील हंगामातही या उद्योगाचे तारणहार ठरण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी सरकार साखर कारखान्यांना मदत करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT