Natural Calamity Agrowon
ताज्या बातम्या

Natural Calamity: सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी : जयंत पाटील

नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले पाटील यांनी गुरुवारी (ता. १४) नांदेड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

ॲग्रोवन वृत्तसेवा

नांदेड : अतिवृष्टीमुळे राज्यासह नांदेड जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलेले आहेत. नांदेड, वसमत परिसरांत ढगफुटी झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकारने त्वरित मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे.

नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले पाटील यांनी गुरुवारी (ता. १४) नांदेड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीची (Extremely Heavy Rain) माहिती दिली.

या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (NCP) नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मोहम्मद खान पठाण, माजी सभापती भगवानराव पाटील आलेगावकर, नांदेड शहर राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष रऊफ जमीनदार आदी उपस्थित होते.

जयंत पाटील यांनी निळा, आलेगाव, एकदरा या गावांची पाहणी केली. शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याची बाब त्यांनी पाहिली. या वेळी पाटील म्हणाले, की संपूर्ण महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीचे संकट कोसळले आहे. नांदेड, वसमत परिसरांत ढगफुटी झाल्याने नदीचे पाणी गावात शिरले. संपूर्ण गावाला पाण्याने वेढा घातला.

यामुळे सोयाबीनची (Soybean) पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने यात तत्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच घरामध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांसाठी जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था करावी, पूरस्थितीचे संकट राज्यात लक्षात घेता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लवकर मंत्री मंडळाचा विस्तार करून लोकांना तत्काळ मदतकार्य सुरू करावे, अशीही त्यांनी मागणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT