Gokul milk Union Agrowon
ताज्या बातम्या

Gokul Milk Union : ‘गोकुळ’तर्फे मँगो, व्‍हॅनिला लस्सी, मसाला ताकाचे उत्पादन

Milk Produces : गोकुळ प्रकल्प येथे संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते अन्य संचालक, अधिकारी यांच्या उपस्थितीत टेट्रापॅकमधील मसाला ताक व मँगो, व्हॅनीला लस्सीचे लाँचिंग करण्यात आले.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा दूध संघातर्फे (गोकुळ) (Gokul) नवीन टेट्रापॅकमधील मँगो, व्‍हॅनिला लस्सी व मसाला ताक ही उत्पादने ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहेत. गोकुळ प्रकल्प (Gokul Project) येथे संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते अन्य संचालक, अधिकारी यांच्या उपस्थितीत टेट्रापॅकमधील मसाला ताक व मँगो, व्हॅनीला लस्सीचे लाँचिंग करण्यात आले.

मागील दोन वर्षांच्या काळात यूएचटी ट्रिटेड होमोजिनाईज्ड टोन्ड दूध ‘सिलेक्ट’ या नावाने गोकुळच्या टेट्रापॅकमधील दुधास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मुंबई, पुणे व इतर विभागातील ग्राहकांकडून दुधाबरोबरच लस्सी व मसाला ताकाचे पॅकिंग टेट्रापॅकमध्ये उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी वारंवार केली जात होती.

मुंबई व पुणे व इतर मार्केटमधील टेट्रामधील लस्सी व मसाला ताकाच्या मागणीचा विचार करता ‘गोकुळ’च्या दर्जेदार दुधापासून टेट्रापॅकिंगमध्ये ताक व लस्सी पॅकिंग करून घेण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले.
प्रास्ताविक संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केले. आभार संचालक किसन चौगले यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT