Gokul Dairy agrowon
ताज्या बातम्या

Gokul Milk Business : ‘गोकुळ’ दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी अरुण डोंगळे!

Gokul Dairy : 'गोकुळ' दूध संघाच्या चेअरमनचे विश्‍वास पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी अरुण डोंगळे यांची निवड करण्यात आली.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ 'गोकुळ'चे चेअरमन विश्वासराव पाटील यांनी दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यानंतर आज गोकुळ शिरगावमधील गोकुळच्या कार्यालयामध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमनपदी अरुण डोंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

अरुण डोंगळे दुसऱ्यांदा गोकुळचे चेअरमन झाले आहेत. यापूर्वी त्यांनी 2010 ते 2013 या कालावधीत संघाचे अध्यक्षपद भूषवले आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोकूळच्या निवडणुकीत माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने महादेवराव पाटील यांची अनेक वर्षांची सत्ता उलथवून टाकली. त्यानंतर सत्ताधारीकडून विश्वासराव पाटील यांना चेअरमनपदाची संधी देण्यात आली. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पाटील यांनी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा मागील संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आज झालेल्या चेअरमन निवडीत अरुण डोंगळे यांची निवड करण्यात आली.

शौमिका महाडिक यांच्या तक्रारीनंतर दूध संघाची चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. यावर गोकूळच्या संचालक मंडळात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावत लेखापरीक्षणाचा अहवाल 8 जूनपर्यंत सादर करण्याचे आदेश आदेश दिले. सध्या दूध संघाचे लेखापरीक्षण सुरू आहे. त्यामुळे नवीन चेअरमन अशोक डोंगळे यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT