Gokul Dudh Sangh agrowon
ताज्या बातम्या

Gokul Dudh Sangh : गोकुळ दूध संघाच्या अधिकाऱ्याला मारहाण, जिल्हापरिषदेच्या माजी सदस्याच्या मुलाचे कृत्य

Gokul Milk : मारहाणीच्या निषेधार्थ 'गोकुळ'च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत जोरदार निदर्शने केली.

Team Agrowon

Gokul Dudh Sangh News : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांच्या मुलाकडून 'गोकुळ'चे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पाटील यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी काल(ता.२३) ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर निदर्शने केली.

संबंधितांनी माफी मागावी किंवा मारहाण करणारा धीरज पाटील याच्यावर गुन्हा नोंद करावा, अन्यथा पशुसंवर्धन सेवा बंद करण्यात येईल, असा इशारा यावेळी संघटनेचे अध्यक्ष शाहीर सदाशिव निकम यांनी दिला.

गोकुळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या धीरज पाटीलने तत्काळ माफी मागावी अशी मागणी करत संघाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, मारहाणीच्या निषेधार्थ 'गोकुळ'च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत जोरदार निदर्शने केली.

बोरवडे केंद्रावर असणाऱ्या बिद्री शितकरणातील डॉ. अनिरुद्ध पाटील यांना मागच्या चार दिवसांपूर्वी शनिवारी (ता. १९) धीरज राजेंद्र पाटील याने मारहाण केली होती. याबद्दल डॉ. पाटील यांनी कर्मचारी संघटनेकडे तक्रार केली. त्यानुसार कर्मचारी संघटनेने निदर्शने करून गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला.

यावेळी डॉ. अनिरुद्ध पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिद्री चिलिंग सेंटरजवळ पत्नी, मुलांसमोर धीरज पाटील याने मारहाण केली. यामुळे माझ्या जिवीतास धोका असल्याने माझ्यासह कुटुबियांना संरक्षण मिळावे. अशा परिस्थितीत राहणे अशक्य असल्यामुळे गोकुळने सरंक्षण द्यावे, अन्यथा आपणास नोकरी सोडण्याशिवाय पर्याय राहणार नाही. असे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

संघटनेच्या प्रतिनिधींनी ही बाब गोकुळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले. गोकुळच्या मुख्य कार्यालयासह जिल्ह्यातील चिलिंग चिलिंग सेंटरवर निदर्शने करण्यात आली. सायंकाळी वाजता गोकुळच्या कर्मचाऱ्यानी जमून मारहाणीच्या घटनेचा निषेध केला.

यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष सदाशिव निकम म्हणाले, संस्थेच्या विरोधात किंवा संस्थेला गालबोट लागेल, असे कृत्य संघटनेने कधीही केले नाही. तुमचे राजकारण तुमच्याजवळ ठेवा. त्याच्यासाठी कर्मचाऱ्यांवर हल्ले होणार असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT