Gokul Milk Kolhapur  agrowon
ताज्या बातम्या

Gokul Dairy : गोकूळच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

Gokul Dairy Chairman Resigns : कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाचे चाचणी लेखापरीक्षण सुरू असताना विश्वास पाटील यांनी राजीनामा दिला गेला आहे. त्यामुळे राज्यभरात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण नेहमीच गोकुळ दुध संघाभोवती फिरते. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी गेली 30 वर्षं गोकुळ संस्थेवर सत्ता राखत जिल्ह्याच्या राजकारणात आपली पकड मजबूत केली होती. दरम्यान काॅंग्रेसचे आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांनी एकत्र गोकुल आपल्या ताब्यात घेतले.

सत्तांतरानंतरही गोकुळ दुध संघामध्ये पाटील विरुध्द महाडिक गट असा संघर्ष पहायला मिळत आहे. महाडिक गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळ संघाचे लेखापरीक्षण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार गोकुळवर चौकशीची टांगती तलावरही आहे.

त्याचवेळी गोकुळ संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला. नुकतीच आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये बैठक झाली. त्यानंतर विश्वास पाटील यांचा राजीनामा संचालक मंडळाने मंजूर केला. येत्या 25 मे रोजी गाेकुळच्या नूतन अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizers Crisis: खतबाजारात खदखद

Strait of Hormuz Crisis: ‘होर्मूझ’मधील पाणसुरुंग हटविण्यास सहा महिने लागण्याची शक्यता

BT Cotton Seed Price: बीटी कापूस बियाण्यांचे दर राहणार ‘जैसे थे’

Maharashtra Weather Forecast: उन्हाचा चटका वाढणार; पावसाचीही शक्यता

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

SCROLL FOR NEXT