Sugar Mill Agrowon
ताज्या बातम्या

Sugar Mill : माळेगाव कारखान्याने दिला ३,१०० रुपये अंतिम ऊसदर

वार्षिक सभेत अध्यक्ष तावरे यांची माहिती

टीम ॲग्रोवन

माळेगाव, ता. बारामती ः माळेगाव साखर कारखान्याने (Malegaon Sugar Mill) १२.०४ टक्के रिकव्हरी असतानाही ३ हजार १०० रुपये अंतिम ऊसदर (Sugar Rate) जाहीर केला. साखर उताऱ्याचा विचार करता माळेगाव कारखाना भावाच्या बाबतीत राज्यात अग्रेसर ठरला आहे. तसेच कारखान्यावरील ११५ कोटी रुपयांचे मागील कर्ज (Sugar Loan) फेडून विरोधकांच्या कारकिर्दीच्या तुलनेत

तीन वर्षांत ४४१ रुपये प्रतिटन सभासदांना अधिकचे दिले, असा दावा ‘माळेगाव’चे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी केला.माळेगाव कारखान्याची ६७वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष तावरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ज्ञानदेव बुरुंगले यांनी अहवाल वर्षात विक्रमी ऊस गळीत आणि उपपदार्थनिर्मिती प्रकल्पाचे

उत्पन्न उच्चांकी असताना ऊसदर मात्र ३ हजार १०० पेक्षा अधिक जाहीर होणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रकाश देवकाते यांनी प्रतिक्विंटल साखरेचे दर वाढल्याखेरीज शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळणार नाही, त्यासाठी शेतकऱ्यांनी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन केले.

संचालकांवर आक्षेप घेतल्याने गोंधळ

धुमाळवाडीचे समीर धुमाळ यांनी, वैयक्तिक द्वेषापोटी संचालक योगेश जगताप यांच्यामुळे माझ्या उसाचे नुकसान झाले, असा आरोप केला.

सदर न्यायप्रविष्ट बाब असताना त्यांनी चुकीचा आरोप केल्याने काही सभासदांनी धुमाळ यांच्याविरुद्ध आवाज उठविला आणि गोंधळ उडाला. पोलिस व पदाधिकाऱ्यांच्या वेळच हस्तक्षेप झाल्याने सभा पुन्हा सुरळीत झाली.

शंभर टन ऊस घेणाऱ्यांचा सन्मान

एकरी शंभर टन ऊस उत्पादन काढलेले शेतकरी संजय यशवंत जगताप (पणदरे), संतोष रामचंद्र तावरे (माळेगाव) यांचा व देशसेवेत उल्लेखनीय काम करणारे सैनिक दिलीप वसंतराव फडतरे (शिरवली) यांचा सत्कार केला.

तसेच सीईटी परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक आलेली विद्यार्थिनी वसुधा गंगाधर फडतरे (सांगवी) या सभासदांच्या मुलांचा बाळासाहेब तावरे आदी संचालकांच्या हस्ते गुणगौरव केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

SCROLL FOR NEXT