Farmer Loan Waive  Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Loan Waive : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान द्या

Farmer Incentive Scheme : सटाणा तालुक्यात मार्च व एप्रिलमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर चार महिने उलटूनही अद्याप नुकसानीची मदत मिळालेली नाही.

Team Agrowon

Nashik News : सटाणा तालुक्यात मार्च व एप्रिलमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर चार महिने उलटूनही अद्याप नुकसानीची मदत मिळालेली नाही.

त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत शासनाने या मदतीसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले ३५० रुपयांचे अनुदान तत्काळ द्यावे, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन तालुक्यातील राष्ट्रीय व सर्व राज्य महामार्गांवर चक्का जाम आंदोलन छेडण्याच इशारा बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी सरकारला दिला.

यासंदर्भात चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. मार्च व एप्रिलमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे हजारो हेक्टर शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले होते.

पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्यामुळे थकित पीककर्ज कसे फेडावे, शेतीचे वीजबिल कसे भरावे, मुलांचे शिक्षण आणि लग्नकार्य कसे करावे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

आपले सरकार सर्वसामान्यांचे आहे का?

मुख्यमंत्री शिंदे यांनी १० एप्रिल रोजी बागलाणचा दौऱ्यावर असताना ८ दिवसांत शेतकऱ्यांना नुकसानीची मदत देण्याचे जाहीर केले होते. मात्र या घोषणेला आता चार महिने उलटले, तरी शेतकरी मदतीपासून अद्याप वंचित आहेत. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती.

सत्तांतरानंतर महायुती सरकारने हाच निर्णय पुढे कायम ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान होते; मात्र अवघ्या ४० टक्के शेतकऱ्यांनाच लाभ झाला असून साठ टक्के शेतकरी अजूनही या अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात संतापाची भावना आहे. आपले सरकार सर्वसामान्यांचे आहे का? असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करत आहेत, असे चव्हाण यांनी नमूद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT