Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या : काँग्रेस

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी चिखली तालुका किसान काँग्रेस सेलच्या वतीने करण्यात आली आहे.

टीम ॲग्रोवन

चिखली, जि. बुलडाणा ः शेतकऱ्यांच्या पीकविम्यासंदर्भातील (Crop Insurance) अडचणी दूर करून तत्काळ पंचनामे करण्यात यावेत. तसेच शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम देण्यात यावी. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी चिखली तालुका किसान काँग्रेस सेलच्या (Chikhli Kisan Congress Cell) वतीने करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची कापणी झालेली नसून, काही शेतांत पाणी साचले आहे. शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. परंतु विमा कंपनीचे अधिकारी शेतात जाऊन पंचनामे करायला तयार नाही.

संबंधित विमा कर्मचारी, कृषी सहायक व तलाठ्यांना सर्वेक्षणाचे आदेश देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवून द्यावा. तसेच शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करावी.

निवेदनावर समाधान गिते, सुधाकर धमक, बाजार समितीचे माजी सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, कृषिमित्र सचिन बोंद्रे, गणेश ठेंग, अ‍ॅड. प्रशांत देशमुख, भारत खासबागे, रामेश्‍वर भुसारी,

दत्तात्रेय करवंदे, लक्ष्मण भिसे, विकास गवारे, दत्तात्रय चव्हाण, प्रकाश गुंजकर, रामदास गिते, सतीश ठेंग, अमोल मोरे, किशोर जाधव, समाधान पाटील, समाधान भटकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT