Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Loan : जिल्हा बँकेलाही ‘ओटीएस’साठी आदेश द्या

नाशिक जिल्हा बँकेत साधारण ६२ हजार शेतकऱ्यांचे १४०० कोटी रुपये थकीत असून या शेतकऱ्यांचे सर्व व्यवहार बँकेने बंद केले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई बँक करत आहे.

टीम ॲग्रोवन

नाशिक : नाशिक जिल्हा बँकेत (Nashik DCC Bank) साधारण ६२ हजार शेतकऱ्यांचे १४०० कोटी रुपये थकीत असून या शेतकऱ्यांचे सर्व व्यवहार (Bank Transaction) बँकेने बंद केले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई बँक करत आहे. परंतु हे शेतकरी सरकारचे चुकीचे धोरण, नोटाबंदी, बँकेचे चुकीचे व्याजदरामुळे (Loan Interest) थकीत झाले आहे.

ही बाब माजी खासदार राजू शेट्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आणून दिली. या शेतकऱ्यांना बँकेच्या कर्जातून मुक्त करायचे असेल तर राष्ट्रीय बँकेप्रमाणे ओटीएस योजना राबवण्याचा आदेश तत्काळ मुख्यमंत्र्यांनी जिल्हा बँकेला द्यावा किंवा या बँकेला स्वतंत्रपणे आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत जिल्हा बँके संदर्भात बैठक पार पडली. या मागणीला भुसे यांनीदेखील दुजोरा दिला. याबाबत सकारात्मक निर्णय करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

जिल्हा बँकेने ६२ हजार शेतकऱ्यांवर कर्जवसुलीची कारवाई सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बँकेची ही दुरवस्था होण्यामध्ये नोटाबंदी, प्रशासनाचा अंनागोंदी कारभार, भ्रष्टाचार कारणीभूत आहे. परंतु या सगळ्यांचा त्रास सर्वसामान्य शेतकऱ्यांना होत असल्याचे जगताप यांनी या वेळी सांगितले.

मागील काही दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात द्राक्ष भाजीपाला या पिकांची दुर्दशा झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा आला नाही आणि शेतकऱ्यांकडून कर्ज थकत गेले. बँकेने नियमबाह्य व्याज लावले. यामुळे मुद्दलापेक्षा अनेक पटींनी व्याज वाढले आहे. जे शेतकऱ्यांच्या भरण्याच्या क्षमतेबाहेर आहे. राज्य सरकारने याबाबत शेतकऱ्यांचा विचार करून दिलासा द्यावा.
संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: अवकाळीचा तडाखा, मुख्यमंत्र्यांकडून सर्वेक्षणाचे आदेश, शेतकऱ्यांना भरपाई मिळणार, बावनकुळेंची माहिती

Crop Disease Management: छाटणीपूर्व नियोजनासोबतच कीड-रोग नियंत्रण आवश्यक

Unseasonal Rain Crop Damage: 'अवकाळी'नं गहू, मका, ज्वारी पीक जमीनदोस्त, कांद्याची पोती भिजली, 'जगायचं कसं?' शेतकऱ्यांचा आर्त सवाल

Highway Toll Hike: टोलमध्ये तीन ते पाच टक्क्यांची वाढ

Jal Jeevan Mission: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘जलजीवन’च्या ७०२ योजना पूर्ण

SCROLL FOR NEXT