Kolhapur News agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur News : एक चूक शेतकऱ्याला भोगली, ४ जनावरांचा होरपळून मृत्यू

Panhala : आग आटोक्याच्या बाहेर गेल्याने या आगीमध्ये एक म्हैस, एक गाय, एक रेडी, एक पाडा अशी चार जनावरे होरपळून मृत्युमुखी पडली.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याच्या उत्रे येथील गुंडोपंत कृष्णा हांडे यांच्या जनावराच्या गोठ्याला अचानक आग लागली.

यामध्ये चार जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर शेड जळून खाक झाले. यामध्ये सुमारे तीन लाख ७० हजारांचे नुकसान झाले आहे.

पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावच्या शेजारी मठाजवळ वैरणीची साठवणूक करण्यासाठी व जनावरे बांधण्यासाठी गुंडोपंत हांडे यांनी गोठा बांधला आहे. जनावरांना वैरण घालून, डासांचा त्रास नको म्हणून धुमी घालून रात्री आठच्या सुमारास घरी गेले होते.

दरम्यान, मध्यरात्री अचानक गोठयाला आग लागल्याचे जवळपास राहणाऱ्या लोकांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी आग विझविण्याचा कसोशीने प्रयत्न केला, पण आग आटोक्याच्या बाहेर गेल्याने या आगीमध्ये एक म्हैस, एक गाय, एक रेडी, एक पाडा अशी चार जनावरे होरपळून मृत्युमुखी पडली.

प्रसंगावधान दाखवून सामाजिक कार्यकर्ते के. एम. पाटील यांनी एका म्हशीला वाचविले. तलाठी कार्यालयाकडून पंचनामा करण्यात आला. आगीमध्ये चार जनावरांचे दोन लाख ७० हजार व शेडचे एक लाख रुपये असे मिळून तीन लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rohit Pawar On Ajit Pawar: '...तर अजितदादा मुख्यमंत्री झाले असते'; रोहित पवार विधानसभेत काय म्हणाले?

Cotton Market Rate: जाणून घ्या; आजचे सोयाबीन, कापूस, पपई, मका आणि केळीचे बाजारभाव

Maize Procurement: सांगोल्यात २१ हजार क्विंटल मका खरेदीविना पडून

Maharashtra Farmer Issues: पीक विमा, अतिवृष्टी सरकारसाठी अडचणीचे

Supreme Court verdict: २०१८ पूर्वीची बंद झालेली जमीन अधिग्रहण प्रकरणे पुन्हा उघडता येणार नाहीत; सर्वोच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT