Sharad Pawar
Sharad Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Sharad Pawar : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार धुळे दौऱ्यावर

टीम ॲग्रोवन

धुळे : कार्यकर्ते आणि दानशूरांच्या आर्थिक योगदानातून राष्ट्रवादी भवनाचे नूतनीकरण (NCP Office Inauguration) झाले आहे. यासंदर्भात होणाऱ्या कार्यक्रमास पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे ३० जुलैला येथे दौऱ्यावर असतील, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी पत्रकाद्वारे दिली.

राष्ट्रवादी भवनाच्या नूतनीकरणाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी श्री. गोटे यांच्याशी मुंबईत चर्चा केली. तसेच या कामाबाबत समाधान व्यक्त केले. यासंदर्भात कार्यक्रमाच्या तयारीसाठी श्री. गोटे यांनी बुधवारी शिंदखेडा, गुरुवारी शिरपूर, शुक्रवारी धुळे शहर व तालुका दौरा आणि शनिवारी मुख्य कार्यक्रमास उपस्थिती, असे नियोजन केले आहे. यानुसार पक्ष कार्यकर्त्यांनी त्या त्या विश्रामगृहात दुपारी एकला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

खासदार पवार हे २९ जुलैला सायंकाळी सातला नाशिकला दाखल होतील. तेथून ते ३० ला सकाळी साडेआठला धुळ्याकडे निघतील. त्यांचे सकाळी साडेअकराला आगमन होईल. मिरवणुकीने ते दुपारी बाराला गुलमोहर विश्रामगृहात उपस्थित होतील. दुपारी साडेबारापर्यंत ते शिष्टमंडळे व कार्यकर्त्यांशी हितगूज साधतील. नंतर दुपारी पाऊण ते अडीचपर्यंत राष्ट्रवादी भवनाच्या नूतनीकरणाचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल. पत्रकारांशी संवादानंतर ते दुपारी साडेतीनपर्यंत मल्हार बागेत असतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT