raju shetti agrowon
ताज्या बातम्या

Raju Shetti News : आजचे सरकार लुच्चे, शेतकऱ्यांना फसवणारे, राजू शेट्टी सरकारवर भडकले

State Government : आजचे सरकार लुच्चे, फसविणारे असून आपणाला ही व्यवस्था तोडून काढावी लागेल. अशा खरपूस भाषेत शेट्टी यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

Team Agrowon

Raju Shetti : माजी खासदार राजू शेट्टी यांनी १ जुलैपासून शेतकरी जनजागृती अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत शेट्टी यांनी काल सांगली येथील वाळवा तालुक्यात सभा आयोजीत केली होती. यावेळी त्यांनी राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या गोंधळावरून जोरदार टीका केली. दरम्यान त्यांनी आजचे सरकार लुच्चे, फसविणारे असून आपणाला ही व्यवस्था तोडून काढावी लागेल. अशा खरपूस भाषेत शेट्टी यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

शेट्टी पुढे म्हणाले की, शोषणमुक्त शेतकरी करण्यासाठी तुम्ही मला साथ द्या, पंतप्रधान मोदी, शिंदे, अजित पवार व फडणवीस यांना महाराष्ट्राचा विकास करण्याचा खूप ध्यास लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या या सरकारला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचा उपरोधिक टोलाही शेट्टी यांनी लगावला.

तसेच किल्ले रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने शेतकरी जनजागृती अभियानाला सुरवात केली आहे. शंभर रुपयांची एफआरपी वाढवून मोदी सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. परंतु ऊस शेतीसाठी प्रत्यक्ष खर्च सोडला तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच राहत नसल्याची खंत व्यक्त केली.

शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असे हातावर हात ठेवून जर थांबलात तर येणारे दिवस वाईट असल्याचा इशारा त्यांनी दिला. बांधावर बसून मी जो दर सांगेल तोच दर कारखान्याने द्यावा, अशी धमक शेतकऱ्यांमध्ये तयार होणे गरजेचे आहे.

तलाठी, तहसीलदार, प्रशासन अधिकारी तुमच्या पैशातून पगार घेतात, तरीसुद्धा चिरीमिरीसाठी हात पसरतात. विकासकामे, रस्ते, पायाभूत सुविधा या तुमच्याच पैशातून होत आहे. मंत्री ठेकेदाराकडून दहा ते पंधरा टक्के घेतात आणि विकास कामे आम्हीच केली, असे छाती बडवून सांगतात. तेलंगणामधील बी. आर. एस.चे मंत्रिमंडळ पंढरपूर मध्ये आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी आले होते का? अशीही टीका शेट्टी यांनी केली.

शेट्टींची सावध भूमिका

आजच्या राजकीय परिस्थितीवर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर राजू शेट्टी म्हणाले, आताच्या राजकारणाचा दर्जा घसरला असून उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची बाजू खंबीरपणे मांडली नाही. स्वतःचे हित साधले जात आहे. तुम्ही कुणाला सोबत घेऊन लढणार का, या प्रश्नावर, मी कुणालाही सोबत घेऊन लढणार नाही.

स्वाभिमानी पक्षातूनच मी लढणार असल्याची सावध भूमिका त्यांनी मांडली. विलासराव मल्टिपर्पज हॉल वाळवा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानां’तर्गत आयोजित सभेत बोलत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

Orange Orchards Crisis: पाण्याअभावी संत्रा बागा संकटात; वाशीममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mango Variety Research: नवसारी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी

Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन

SCROLL FOR NEXT