Rain
Rain Agrowon
ताज्या बातम्या

Rain Forecast : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

Team Agrowon

फेब्रुवारी महिन्यात देशात ८९ ते १२२ टक्के म्हणजेच सरासरी इतक्या पावसाची शक्यता (Rain Forecast) हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे. १९७१ ते २०२० या कालावधीतील दीर्घकालीन सरासरीनुसार फेब्रुवारी महिन्यात देशात सरासरी २७.२ मिलिमीटर पाऊस पडतो.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक ते सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे.

पश्‍चिम मध्य प्रदेशात सरासरीपेक्षा अधिक, तर गुजरातसह दक्षिण भारतातील राज्यात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील ला-निना स्थिती निवळण्यास सुरुवात झाली आहे.

फेब्रुवारी अखेरपर्यंत ला-निना निवळून सर्वसामान्य स्थिती येण्याची शक्यता आहे. तर इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सामान्य स्थितीत राहण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Story : वळवाचा पाऊस...

Turmeric Cultivation : हळद लागवडीची पूर्वतयारी

Finland Banking System : फिनलँडमधील सक्षम सहकारी बँकिंग व्यवस्था

Agriculture Success Story : माळरानाचे पालटले चित्र...

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनास हवामान अनुकूल

SCROLL FOR NEXT