Radhakrushna vikhe patil  Agrowon
ताज्या बातम्या

Dhangar Reservation : आरक्षणाच्या मागणीसाठी राधाकृष्ण विखे पाटलांवर भंडारा उधळला, धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला मारहाण

Radhakrushna vikhe patil : सध्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाजाचे आंदोलन तापले असताना धनगर समाजही आक्रमक झाला आहे. धनगर समाजाच्या रोषाला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना सामोरे जावे लागले.

Swapnil Shinde

Throw Bhandara : राज्यात आरक्षणाचा मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. मराठा समाज रस्त्यावर आले असताना आता धनगर आरक्षणासाठी सोलापूरात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना रोषाला सामोरे जावे लागले. धनगर आरक्षण कृती समितीच्या एका कार्यकर्त्याने विखे-पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळत आरक्षण देण्याची घोषणा दिल्या.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आज (ता. ८) सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी विश्रामगृहात विखे-पाटलांची भेट घेण्यासाठी धनगर आरक्षण कृती समितीचे कार्यकर्ते आले. त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी करणारे निवेदन दिले. हे निवेदन विखे-पाटील वाचत असताना शंकर बंगाळे याने खिशातून भंडारा काढून सरळ डोक्यावर टाकला. यावेळी त्याच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी 'यळकोट-यळकोट जय मल्हार'च्या घोषणा दिल्या.

हा प्रकार घडताच राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अंगरक्षकांनी आणि समर्थकांनी तातडीने शंकर बंगाळे याला खाली पाडून लाथाबुक्कांनी मारहाण केली. यानंतर पोलिसांनी शंकर बंगाळे याला ताब्यात घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT