Grapes Agrowon
ताज्या बातम्या

Sangali Grapes: सांगलीत द्राक्ष बागांसाठी सध्या पोषक वातावरण

सध्या बागेत शेणखत, बोर्डो टाकण्यास अन्य कामे शेतकरी करत आहेत. पोषक वातावरणामुळे काडी चांगली तयार झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक (Grapes Producer)शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे.

ॲग्रोवन वृत्तसेवा

सांगलीः जिल्ह्यातील द्राक्ष (Grapes) बागांसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे काडी चांगली तयार झाली आहे. रोगांचा प्रादुर्भाव नाही. १५ ऑगस्टपर्यंत कवठेमहांकाळ, मिरज, कडेगाव तालुक्यांत आगाप फळ छाटणी सुरु होईल. जुलैच्या शेवटचा आठवड्यात मजूर दाखल होतील, अशी शक्यता आहे.

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून द्राक्ष (Grapes) बागांवर नैसर्गिक आणि पावसाचे संकट आले. द्राक्षाच्या उत्पादनात घट झाली. परिणामी बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या हंगामात पावसामुळे हंगाम उशिरा सुरु झाला आणि उशिरा संपला. त्यामुळे एप्रिल महिन्यात होणारी खरड छाटणी काही दिवसांनी लांबणीवर पडली. त्यातूनही शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करून खरड छाटणी पूर्ण केली.

सध्या बागेत शेणखत, बोर्डो टाकण्यास अन्य कामे शेतकरी करत आहेत. पोषक वातावरणामुळे काडी चांगली तयार झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक (Grapes Producer)शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, कडेगाव, आणि मिरज तालुक्यांत प्रामुख्याने आगाप फळ छाटणी घेण्याचा कल शेतकऱ्यांचा असतो. त्या दृष्टीने शेतकरी बागेतील कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करत आहेत.

जिल्ह्यात परराज्यातून सुमारे ३० ते ४० हजार मजूर द्राक्ष बागेत काम करण्यासाठी येतात. सध्या परराज्यातील शेतातील कामे पूर्ण झाली की ते जिल्‍ह्यात दाखल होतील, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात द्राक्ष बागांना सध्या पोषक वातावरण आहे. काड्या चांगल्या झाल्या आहेत. वातावरण असेच राहिले तर रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. आगाप फळ छाटणी ऑगस्टच्या मध्यापासून सुरु होईल, अशी शक्यता आहे.
महादेव लाड, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कुंडल, जि. सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT