Cold Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : राज्याच्या अनेक भागांत धुक्याची दुलई

ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत आहे. किमान तापमानात काहीशी वाढ झाली असली, तरी गारठा मात्र कायम आहे.

Team Agrowon

पुणे : ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत आहे. किमान तापमानात काहीशी वाढ झाली असली, तरी गारठा मात्र कायम आहे. गुरुवारी (ता. ५) सकाळी महाराष्ट्राच्या अनेक भागांत धुक्याची दुलई पाहायला मिळाली. आजपासून (ता. ६) उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भासह राज्याच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्याच्या अनेक भागांत असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले. गुरुवारी (ता. ५) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरित राज्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या वर गेले असून, बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा १४ ते २१ अंशांच्या दरम्यान होता. आजपासून (ता. ६) राज्याच्या किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होत थंडीचा कडाका वाढण्याचे संकेत आहेत.

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दिवसभर असलेल्या ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात मोठी घट झाली. परिणामी, गेले अनेक दिवस तीस अंशांपार असलेला किमान तापमानाचा पारा २० अंशांपर्यंत खाली घसरल्याचे दिसून आले. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तर राजस्थानमध्ये थंडीची तीव्र लाट

उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र झाल्याने पारा शून्य अंशांच्या खाली घसरला आहे. गुरुवारी (ता. ५) उत्तर राजस्थानमधील चुरू आणि सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी उणे १.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. ६) राजस्थानाच्या काही भागांत थंडीची तीव्र लाट, तर पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यात थंडीची लाट कायम राहून, थंड दिवस अनुभवायला मिळणार आहे. उत्तर भारतासह आणि ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.

गुरुवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २९.७ (१४.८), जळगाव २२.७ (१२), धुळे २३ (७.६), कोल्हापूर ३० (१८.८), महाबळेश्‍वर २४.३ (१४.५), नाशिक - (१३.२), निफाड २३.४ (१०.५), सांगली ३०.१ (१७.८), सातारा ३०.३ (१७.५), सोलापूर ३२ (१७.६), सांताक्रूझ ३०.२ (१८.८), डहाणू २७ (१५.९), रत्नागिरी ३०.२ (२१), औरंगाबाद २६.५ (१३.२),

नांदेड - (१८.८), उस्मानाबाद ३० (१७), परभणी २९.८ (१६.६), अकोला २४.८ (१७.५), अमरावती २४ (१५), बुलडाणा १९.४ (१३.३), ब्रह्मपुरी २१.२ (१४.६), चंद्रपूर २७ (१६.६), गडचिरोली २६.०(१४.६), गोंदिया २० (१७.२), नागपूर २१ (१५.१), वर्धा २४ (१५), यवतमाळ २५.५ (१५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT