Farmer Producer Company Agrowon
ताज्या बातम्या

SMART Project : स्मार्ट प्रकल्पातून मूल्यवर्धनावर भर द्या ः राजेंद्र साबळे

शेतकरी उत्पादक कंपन्या व समुदाय आधारित संस्थांनी स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीमाल मूल्यवर्धनासाठी पुढे आले पाहिजे

Team Agrowon

गोदिंया ः शेतकरी उत्पादक कंपन्या (Farmers Producers Company) व समुदाय आधारित संस्थांनी स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीमाल मूल्यवर्धनासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे यांनी केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. स्मार्ट प्रकल्पाच्या नोडल अधिकारी प्रज्ञा गोळघाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण या वेळी उपस्थित होते. राजेंद्र साबळे म्हणाले, ‘‘शेतीमालाचे मूल्यवर्धन, प्रक्रिया आणि ब्रॅण्डिंग ही काळाची गरज आहे. त्याशिवाय बाजारात शेतमालाला अपेक्षित दर मिळू शकत नाही.

अशा प्रकारच्या मूल्यवर्धनातून देशभरातील बाजारपेठ उपलब्ध होत अपेक्षित दरही मिळविणे शक्‍य होते. त्यामुळे शेतकरी कंपन्या व समुदाय आधारित संस्थांनी शासकीय योजनांचा लाभ घेत अशा प्रकारच्या प्रकल्पाची उभारणी करावी. त्यातून गावस्तरावर रोजगार निर्मितीचा उद्देशही साधता येणार आहे.

स्मार्ट प्रकल्पामार्फत मूल्यसाखळी निर्माण करण्याकरिता पिकावर प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया करण्याविषयी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीला जिल्ह्यातील २९ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक उपस्थित होते.

तसेच जिल्ह्यातील स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्षातील अधिकारी कावेरी साळे, पुरवठा व मूल्यासाखळी तज्ज्ञ सचिन कुंभार, तालुका कृषी अधिकारी डॉ. एल. तुमडाम, व्ही. एन. कुंभारे, उपस्थित होते. जिल्ह्यातील १५ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्मार्ट प्रकल्पाचा लाभ घेतल्याचे प्रज्ञा गोळघाटे यांनी यावेळी सांगितले. त्यापैकी सहा शेतकरी उत्पादक कंपन्यांना अंतिम मंजुरी प्राप्त आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT