Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : किमान तापमानात चढ-उतार

उत्तर भारतात थंडीची तीव्रता वाढली असतानाच, महाराष्ट्रात किमान तापमानात चढ- उतार होत आहेत. उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडी कायम आहे.

Team Agrowon

पुणे : उत्तर भारतात थंडीची (Clod Weather) तीव्रता वाढली असतानाच, महाराष्ट्रात किमान तापमानात चढ- उतार (Temperature Fluctuate) होत आहेत. उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडी (Cold) कायम आहे. आज (ता. १७) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या उत्तर भागात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आहे. सोमवारी (ता. १६) धुळे येथील कृषी महाविद्यालय व निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्याच्या नीचांकी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

जळगाव, औरंगाबाद येथेही तापमानाचा पारा १० अंशांपेक्षा खाली असून उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. कमाल तापमानातही वाढ-घट सुरूच असून, तापमानाचा पारा २६ ते ३४ अंशांच्या आसपास आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

एकामागून एक येणाऱ्या पश्चिमी चक्रावातांच्या प्रभावामुळे हिमालयपर्वत आणि लगतच्या भागात हिमवृष्टी सुरूच आहे. थंडीची लाट आल्याने सोमवारी (ता. १६) राजस्थानच्या चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या हंगामातील नीचांकी उणे २.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १७) राजस्थान, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यात दाट धुके पडण्याचा अंदाज आहे.

सोमवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३१.४ (१०.८), जळगाव २७.० (१०), धुळे २६ (६.५), कोल्हापूर ३१.३ (१६.९), महाबळेश्वर २६.८(१३), नाशिक २९.५ (१०.५), निफाड ३०.५ (६.५),

सांगली ३१.१ (१५.१), सातारा ३१.९(१२.७), सोलापूर ३३.७ (१५.५), सांताक्रूझ २७.४ (१५.४), डहाणू २५.२ (१३.२), रत्नागिरी २९ (१६), औरंगाबाद २९.८ (१०), नांदेड - (१५.४), परभणी ३०.५(१५), अकोला ३०.६ (१५.२), अमरावती २९.८ (१३),

बुलडाणा २८ (१३.८), ब्रह्मपुरी ३०.२ (१४.५), चंद्रपूर २८.६ (१६.२), गडचिरोली ३०.४(१४.४), गोंदिया २७(११.५), नागपूर २८.१ (१३.८), वर्धा २९.४(१४.४), वाशीम - (१५), यवतमाळ २९.७ (१४.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT