Indian Wheat Agrowon
ताज्या बातम्या

फ्लोअर मिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी केंद्रीय अन्न सचिवांना भेटणार

खाद्यतेल आणि डाळींप्रमाणे केंद्र सरकार भविष्यात गव्हाच्या साठयांवर मर्यादा घालण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरल्याने मिलर्स सध्या मोठ्या प्रमाणात गहू खरेदी करण्यास धजावत नसल्याचे प्रक्रिया उद्योग क्षेत्राचे म्हणणे आहे.

Team Agrowon

सरकारकडून गहू निर्यातवाढीला (Wheat Export) प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे देशातील गव्हाचे दरही वाढत आहेत. या परिस्थितीत देशभरातील फ्लोअर उद्योग क्षेत्रात संभ्रमाचे वातावरण आहे. यासंदर्भात प्रक्रिया उद्योग क्षेत्राचे पदाधिकारी या आठवड्यात केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा सचिवांची भेट घेणार आहेत.

केंद्र सरकारने गहू निर्यातीत हस्तक्षेप केला नाही तर येत्या २ ते ३ महिन्यांत पिठाच्या किंमतीत १० टक्क्यांनी वाढतील. खाजगी व्यापाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात गहू (wheat) खरेदी केला जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणात गहू निर्यातही होत आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात गहू योग्य दरात मिळणे मुश्किल होईल, अशी शक्यता गहू प्रक्रिया उद्योग क्षेत्राकडून व्यक्त करण्यात येत आहे.

खाद्यतेल आणि डाळींप्रमाणे केंद्र सरकार भविष्यात गव्हाच्या (Wheat)साठयांवर मर्यादा घालण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरल्याने मिलर्स सध्या मोठ्या प्रमाणात गहू खरेदी करण्यास धजावत नसल्याचे प्रक्रिया उद्योग क्षेत्राचे म्हणणे आहे.

फ्लोअर मिलिंग उद्योग क्षेत्र आजमितीस प्रचंड संभ्रमात आहे. आमच्यासमोर अशी परिस्थिती कधीच आली नव्हती. अगदी काढणीच्या हंगामात आम्हाला अनुकूल दरात खरेदीसाठी गहू मिळत नसल्याचे ऑल इंडिया रोलर फ्लोअर मिल्स असोसिएशनचे (RFMA) उपाध्यक्ष नवनीत चितलंगिया म्हणाले आहेत.

पंजाब आणि हरियाणात गहू उपलब्ध नसल्याने संपूर्ण मिलिंग उद्योग क्षेत्र आता गव्हासाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गव्हाकडे डोळे लावून बसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान केंद्र सरकारने बिगर हंगामात भारतीय अन्न महामंडळाची (FCI) गव्हासाठीची खुल्या बाजारातील विक्री योजना (OMSS) सुरु ठेवावी, अशी मागणी यापूर्वीच रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडियाने (FMFI) केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Market Rate: सध्या हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा ८०० ते ११०० रुपयांपेक्षा कमी

Irrigation Management: सिंचन व्यवस्थापन अराजकतेच्या वळणावर

Smart Farming: पपई- मिरची- खरबूज पद्धतीतून उत्पन्नाचा हुकमी स्रोत

Dairy Farming Success Story: दुग्ध व्यवसाय हेच झाले माझे विश्‍व

Fertilizer Subsidy: खत अनुदान थेट शेतकऱ्यांना देणे शक्य; डीबीटी यंत्रणा उभारण्याच्या कृषिमंत्र्यांच्या सूचना

SCROLL FOR NEXT