Gram Panchayat Election Agrowon
ताज्या बातम्या

Gram Panchayat Election : आंबेगावमधील पाच ग्रामपंचायती बिनविरोध

आंबेगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींतील सदस्यपदांसह थेट सरपंचपदाची निवडणूक जाहीर झाली असून, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.

टीम ॲग्रोवन

आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींतील (Grampanchayat Election) सदस्यपदांसह थेट सरपंचपदाची निवडणूक (Election) जाहीर झाली असून, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.

तर उर्वरित १६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी ३८ उमेदवार रिंगणात आहेत. तर, सदस्यपदांसाठी एकूण २५९ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आंबेगाव तालुक्यातील निवडणूक लागलेल्या २१ ग्रामपंचायतींपैकी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच व सदस्य यांचे एकमेव अर्ज असलेल्या नागापूर, डिंभे खुर्द, तळेघर, चिखली व आहुपे या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. तर, उर्वरित १६ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहे.

यामध्ये घोडेगाव, साल, आंबेदरा, आमोंडी, गंगापूर खुर्द, चिंचोडी, कळंब, पारगावतर्फे खेड, मेंगडेवाडी, भावडी, नारोडी, रांजणी या १२ गावांतील सरपंचपदांसाठी प्रत्येकी दोन उमेदवार उभे आहेत. निघोटवाडी, चांडोली बुद्रुक, धामणी या तीन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी प्रत्येकी तीन उमेदवार असून, गोहे खुर्द सरपंचपदासाठी ५ उमेदवार असे एकूण ३८ उमेदवार रिंगणात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT