Cotton Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Theft : कापूस चोरणारे पाच संशयित ताब्यात

गेल्या काही महिन्यांपासून साक्री तालुक्यात कापूस चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यात प्रामुख्याने शेतात, शेतातील शेडमध्ये साठवून ठेवलेला कापूस चोरण्याच्या घटना वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.

Team Agrowon

साक्री : तालुक्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांचा कापूस चोरणारे (Cotton Theft) पाच संशयित पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले. सदर चोरट्यांना नंदुरबारच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने साक्री हद्दीतून ताब्यात घेऊन अटक (Cotton Thieves Arrest) केली होती.

तर तपासासाठी सदर संशयितांना साक्री पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांनी तालुक्यातील विविध गावातून देखील कापूस चोरी गेल्याची कबुली दिली. यात पोलिसांनी दोन लाख ४० हजार किमतीचा ३० क्विंटल कापूस हस्तगत केला.

गेल्या काही महिन्यांपासून साक्री तालुक्यात कापूस चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यात प्रामुख्याने शेतात, शेतातील शेडमध्ये साठवून ठेवलेला कापूस चोरण्याच्या घटना वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.

या चोरीच्या घटना वारंवार घडत असताना या संदर्भात साक्री पोलिसात अनेक गुन्हे दाखल होऊन देखील चोरट्यांचा शोध लागत नव्हता.

अखेर या चोरट्यांना साक्री हद्दीतून ताब्यात घेऊन अटक केली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, प्रदीप मैराळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलिस उपनिरीक्षक बी. बी. आदींचे पथक या संशयितांचा शोध घेत असताना त्यांनी नंदुरबार पोलिसांकडून सदर संशयिताना तपासासाठी ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

यात दिलीप किशोर भिल (ता. तळवाडे जि.नंदुरबार), सुरेश रामलाल माळीच (रा. कोकले ता.साक्री), जगदीश राजू माळचे (रा.कावठे), प्रमोद सुखदेव शिवदे, सुनील बापू मरसाळे (रा.कावठे ता.साक्री) यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी अष्टाने, कावठे, शेवाळी, कासारे परिसरातील कापूस चोरी केल्याची कबुली दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Farmer Challenges: पांढऱ्या सोन्याची शोकांतिका

Indian Farmer Challenges: आठ हात लाकूड, नऊ हात धिपली

Pune Water Circulation: नऊ धरणांतून उन्हाळी आवर्तन

Job Recruitment Policy: नोकरी देताना भरती नियमांचे पालन आवश्‍यक

Ready Reckoner Rates: रेडीरेकनर दर वाढ स्थगित

SCROLL FOR NEXT