Namo Shetkari Sanman agrowon
ताज्या बातम्या

Namo Shetkari Sanman : 'नमो शेतकरी सन्मान'चा पहिला हप्ता कधी जमा होणार? कृषी मंत्र्यांनी दिले निर्देश

Namo Shetkari Mahasanman Nidhi : प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली.

Team Agrowon

Agriculture News : प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा झाला नाही. याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पहिला हप्ता जमा करण्याचे निर्देश दिले.

याबाबत कृषी मंत्री मुंडे म्हणाले की, पावसाळी अधिवेशन २०२३-२४ मधील पूरक मागण्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामधून योजनेचा पहिला व दुसरा हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता आहे.

राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असल्याने त्याला तत्काळ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळणे गरजेचे असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा नमो महासन्मान योजनेत समावेश करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न युद्ध पातळीवर करण्याचे निर्देश कृषी मंत्री मुंडे यांनी दिले.

निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार असल्याने त्यामध्ये योजनेची नोंदणी करण्यात आलेली आहे. पी.एम.किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्युल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटीकडून सुरू आहे.

पी. एफ. एम. एस. प्रणालीमध्ये तांत्रिक कार्यवाही करण्यासाठी आवश्यक कालावधी कमी करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे यावेळी कृषी मंत्री मुंडे यांनी सांगितले. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत कृषी विभागासह अन्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT