Financial Literacy Agrowon
ताज्या बातम्या

Financial Literacy : आर्थिक साक्षरता, शिस्त,बचत ही त्रिसूत्री महत्त्वाची

‘‘समाज आर्थिक दृष्ट्या समृद्ध होण्याकरिता आर्थिक साक्षरता, आर्थिक शिस्त, आर्थिक बचत ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे,’’ असे मत उद्योजक मिलिंद पोहनेरकर यांनी व्यक्त केले.

ॲग्रोवन वृत्तसेवा

औरंगाबाद : ‘‘समाज आर्थिक दृष्ट्या समृद्ध होण्याकरिता आर्थिक साक्षरता, (Financial Literacy) आर्थिक शिस्त, आर्थिक बचत ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे,’’ असे मत उद्योजक मिलिंद पोहनेरकर यांनी व्यक्त केले.

ग्रामविकास संस्थेच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या निधी बँकेच्या ग्रामविकास भवन एन -२ सिडको, औरंगाबाद येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी ग्रामविकास निधी बँकेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे उपस्थित होते.

पोहनेरकर म्हणाले, ‘‘ग्रामविकास अर्बन निधी बँकेमुळे शेतकरी, महिलांच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली आहे. बँकेमुळे समाजातील वंचित, अल्पभूधारक, युवक छोट्या व्यावसायिकांना आर्थिक समृद्धीची संधी उपलब्ध झाली. ग्रामविकास बँकेत ही शिस्त पाळल्यामुळे वसुली शंभर टक्के आहे.’’ बँकेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी प्रास्ताविक केले.

या वर्षी बँकेतर्फे ५०० कुटुंबांना अर्थसाहाय्य करण्यात आले. ग्रामविकास निधी बँकेतर्फे आर्थिक मदत घेऊन प्रगती केलेल्या शेतकरी महिला, युवकांनी मनोगत व्यक्त केले. बापूराव भोसले, विठ्ठल झिने, चंद्रकांत चव्हाण, भगवान कुबेर, संतोष पाटील, अप्पासाहेब हुलसार, चित्तेनदी खोऱ्यातील शेतकरी, बचत गटाच्या महिला, छोटे व्यावसायिक उपस्थित होते. सूत्रसंचालन बालाजी बिरादार यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT