Kolhapur APMC Agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur APMC : कोल्हापूर बाजार समितीची अंतिम मतदारयादी जाहीर

शेती उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम न्यायालयाच्या आदेशाच्या आधिन राहूनच राबवला जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून बाजार समितीच्या मतदारांची अंतिम यादी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केली.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर ः शेती उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक (Kolhapur APMC Election) कार्यक्रम न्यायालयाच्या आदेशाच्या आधिन राहूनच राबवला जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून बाजार समितीच्या मतदारांची अंतिम यादी (APMC Voter List) निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केली. यात बाजार समितीसाठी २१ हजार ९०५ मतदारांचा समावेश आहे. पुढील निवडणूक नियोजनानुसार २३ ते २९ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज भरले जातील.

ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य बाजार समिती निवडणुकीसाठी मतदार आहेत. त्याची कच्ची यादी बाजार समितीने सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे दिली होती. त्यावर हरकती आल्या, सुनावणी झाली. त्यानंतर अंतिम यादी जाहीर झाली. अशात जिल्ह्यातील ६०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या.

३०३ ग्रामपंचायतींतील सदस्य कोल्हापूर बाजार समितीसाठी मतदार आहेत. त्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर नवीन सदस्यांचा बाजार समितीच्या मतदारयादीत समावेश करावा. तोपर्यंत बाजार समिती निवडणुका स्थगित कराव्यात, अशी मागणी करणारी याचिका माजी संचालक ॲड. किरण पाटील व नाथाजी पाटील यांनी दाखल केली आहे.

त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे; मात्र सहकार निवडणूक प्राधिकारणाने यापूर्वी नियोजित निवडणूक कार्यक्रमानुसार अंतिम यादी जाहीर झाली. बाजार समितीच्या निवडणुकांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत निवडून येणाऱ्या सदस्यांची नावे बाजार समितीच्या मतदारयादीत समाविष्ट होणार की नाही याचा पेच मात्र कायम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT