ताज्या बातम्या

Sugar Mill : ‘अजिंक्यतारा’ कडून १४१ रुपयांचा शेवटा हप्ता जमा

गाळप झालेल्या उसाला प्रतिटन १४१ रुपयेप्रमाणे शेवटच्या हप्त्याची सर्व रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.

टीम ॲग्रोवन

सातारा : गाळपासाठी येणाऱ्या उसाचे १० दिवसांत पेमेंट देणारा कारखाना अशी ख्याती मिळवलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने (Ajinkyatara Co-operative Sugar Mill) ऊस पुरवठादार सभासद, शेतकऱ्यांची दिवाळी यंदाही गोड केली आहे. गाळप झालेल्या उसाला प्रतिटन १४१ रुपयेप्रमाणे शेवटच्या हप्त्याची सर्व रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांनी दिली आहे.

तसेच, १८ टक्क्यांप्रमाणे कामगारांना दिवाळी बोनस कामगारांच्या बँक खात्यावर जमा केला आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले, की अजिंक्यतारा कारखाना पूर्णपणे आर्थिक सक्षम झाला आहे.

मागील गळीत हंगामात उच्चांकी गाळपाचा विक्रम करून कारखान्याने एफआरपीनुसार प्रतिटन २९४१ रुपये दर दिला आहे. त्यातील २६०० रुपयांचा पहिला हप्ता १० दिवसांच्या आत संबंधित शेतकऱ्यांना अदा केला. त्यानंतर २०० रुपयांचा दुसरा हप्ताही वेळेत दिला.

आता दिवाळीपूर्वीच १४१ रुपये प्रतिटन तिसरा आणि शेवटचा हप्ता याप्रमाणे १२ कोटी २७ लाख ३७ हजार ८७८ रुपये एवढी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करून कारखान्याने एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम अदा केली आहे.

तसेच दिवाळीनिमित्त कामगारांना बोनस देण्याची परंपरा कारखान्याने सातत्याने जपली आहे. यंदाही कामगारांना १८ टक्के बोनस दिला आहे. त्यापोटी ३ कोटी २९ लाख ५६ हजार रुपये एवढी रक्कम कामगारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT