Kisan Sabha Agrowon
ताज्या बातम्या

येत्या काळात बेरोजगारी, महागाईविरोधात लढा उभारणार

सद्यःस्थितीत वाढती बेरोजगारी, महागाई याविषयी तीव्र लढा उभा करावा लागणार असून, केंद्र व राज्य शासन आदिवासी, दलित व महिला यांच्या विरोधात जी भूमिका घेत आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : सद्यःस्थितीत वाढती बेरोजगारी (Unemployment), महागाई (Inflation) याविषयी तीव्र लढा उभा करावा लागणार असून, केंद्र व राज्य शासन आदिवासी (Tribal), दलित व महिला यांच्या विरोधात जी भूमिका घेत आहे. त्याविरोधात लढा उभा करणे गरजेचे आहे. यापुढील काळात संघटना कशी बळकट होईल यासाठी प्रयत्न करावे लागतील, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे (All India Kisan Sabha) पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड. नाथा शिंगाडे यांनी दिला.

किसान सभा आंबेगाव तालुका समितीचे पाचवे त्रैवार्षिक अधिवेशन आंबेगाव तालुक्यातील तळेघर येथे गुरुवारी (ता. १८) मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनात ॲड. शिंगाडे बोलत होते. या वेळी ‘एसएफआय’चे पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी, किसान सभेचे तालुका अध्यक्ष कृष्णा वडेकर यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या वेळी तालुका सचिव अशोक पेकारी यांनी तीन वर्षांच्या कामकाजाचा अहवाल मांडला. उपस्थित प्रतिनिधी यांनी या अहवालावर चर्चा करून हा अहवाल एकमताने संमत केला.

आंबेगाव तालुक्यात प्रथम किसान सभेचे काम सुरू करणारे व या कामाला सर्व ते सहकार्य करणारे, आदिवासी सेवक, निसर्गवासी शंकर विठू केंगले यांचे मोठे योगदान आहे, असेही अॅड. शिंगाडे म्हणाले. या कार्यक्रमात अशोक पेकारी यांनी प्रास्ताविक केले. तर नंदाताई मोरमारे यांनी आभार मानले.

किसान सभेची आंबेगाव तालुका समितीची निवड करण्यात आली. या वेळी अध्यक्षपदी नंदा मोरमारे, सचिव रामदास लोहकरे यांची एकमताने निवड करण्यात आली. नवनिर्वाचित तालुका पदाधिकारी ः बाळू काठे, कमलताई बांबळे, पुंडलिक असवले, मच्छिंद्र वाघमारे, दत्ता गिरंगे, सुभाष भोकटे, लक्ष्मण मावळे यांची निवड करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT