Paddy Seedling Agrowon
ताज्या बातम्या

भातरोपे वाळून जाण्याची भीती

पावसाच्या आशेने शेतकऱ्यांनी भातपेरणी केली, मात्र तालुक्यात मॉन्सूनने हुलकावणी दिली आहे.

टीम ॲग्रोवन

भुकूम, ता. मुळशी ः पावसाच्या आशेने शेतकऱ्यांनी भातपेरणी (Paddy Planting) केली, मात्र तालुक्यात मॉन्सूनने (Monsoon) हुलकावणी दिली आहे. पावसाअभावी उगवलेली भातरोपे (Padyy Seedling) वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, ‘मॉन्सून आला’ असे हवामान खाते सांगत असले तरी, ‘पाऊस कुठे आहे,’ अशी परिस्थिती मुळशीत निर्माण झाली आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी दर वर्षीप्रमाणे यंदाही सात जूनपासून भातपेरणी केली. धूळवाफ साधल्यास रोपांची उगवण चांगली होऊन लावणी वेळेत होते. त्यामुळे उत्पन्न चांगले मिळते हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे तालुक्यातील मुठा खोरे, रिहे खोरे, कोळवण खोरे, पौड माले भागांत शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली. दहा जूनच्या दरम्यान काही ठिकाणी तुरळक, तर काही भागांत मध्यम स्वरूपात पाऊस झाला. त्यामुळे भातरोपांची उगवण झाली.

सध्या पावसाने मोठी उघडीप दिली असून, दिवसभरात कधी कडक ऊन, तर कधी ढगाळ हवामान असे वातावरण तालुक्यात आहे. बारमाही पाण्याची सोय नसलेल्या शेतकऱ्यांची भातरोपे वाळून जाण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. ढग भरून आल्यावर शेतकऱ्यांमध्ये पाऊस पडेल अशी आशा निर्माण होते, पण पाऊस काही पडत नाही. त्यामुळे मॉन्सून आला, पण पाऊस कुठे, असा प्रश्‍न तालुक्यातील शेतकरी विचारत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief : दुष्काळ निवारणात कसूर केल्यास कारवाई

Mula Canal Breach : चांद्याजवळ मुळा उजव्या कालव्याचा भराव खचला

Fodder Management : पिण्याचे पाणी, चाऱ्याचे तातडीने नियोजन करा

Land Acquisition: भूमी अधिग्रहण कायदा रद्द करा : लक्ष्मीकांत कौठकर

Soil Moisture: दुष्काळाच्या परिस्थितीत मातीतील ओलावा कसा टिकवावा?

SCROLL FOR NEXT