Weather Update
Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाला पोषक हवामान

Team Agrowon

Pune News : अरबी समुद्रावरून (Arabian Sea) होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान (Cloudy Weather) होत आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान झाले असल्याने आज (ता. २५) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा (Cold Weather) कमी झाला आहे.

नैॡत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. नैॡत्य उत्तर प्रदेशापासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

यामुळे अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. यातच उत्तर अंतर्गत तमिळनाडूमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे.

आज (ता. २५) कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

मंगळवारी (ता. २४) उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्र येथे राज्यातील नीचांकी ९.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९,६ अंश तापमानाची नोंद झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात वाढ झाली आहे.

दरम्यान, राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून, उन्हाचा चटका वाढला कायम आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा २९ ते ३३ अंशांच्या आसपास आहे. ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३२.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी झाली आहे. मंगळवारी (ता. २४) राजस्थानच्या बिकानेर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. २५) उत्तर खंड आणि उत्तर प्रदेशात तुरळक ठिकाणी विजांसह गारपिटीची तर पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, पूर्व उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मंगळवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.२ (१२.३), जळगाव ३०.७ (१२.८), धुळे २८ (९.६), कोल्हापूर ३०.२ (१७.७), महाबळेश्वर २५.१(१४.४), नाशिक २८.५ (११), निफाड २९ (९.५), सांगली २९.७ (१६.७), सातारा ३०.५ (१४.५), सोलापूर ३२.१ (१९.३),

सांताक्रूझ २६.५ (१४.८), डहाणू २५.८ (१४.५), रत्नागिरी २९.०(१७.६), औरंगाबाद २९.६ (११.६), नांदेड ३२.८ (१६.८), उस्मानाबाद ३०.१ (१५.९), परभणी ३१.०(१६.७), अकोला ३१.३ (१७), अमरावती ३१(१६.८), बुलडाणा ३१ (१७.२),

ब्रह्मपुरी ३२.९ (१७.१), चंद्रपूर २८.२ (१७.४), गडचिरोली ३१.०(१५.४), गोंदिया ३१.८(१५.२), नागपूर ३१ (१५.५), वर्धा ३०.२(१६), वाशीम ३१.६ (१५), यवतमाळ ३०.० (१९).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT