Monsoon Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : मॉन्सून परतीसाठी पोषक हवामान

राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली असतानाच पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असून, सोमवारी (ता. २६) दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती.

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्यात उन्हाचा चटका (Temperature) आणि उकाड्यात वाढ (Heat) झाली असतानाच पुन्हा पावसाला पोषक हवामान (Favorable Weather Condition) होत आहे. मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान (Cloudy weather) असून, सोमवारी (ता. २६) दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. आज (ता. २७) उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast With Lightning Marathwada) हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

उत्तर पंजाब आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीपासून बिहार पर्यंत हवेचा कमी दाबाचा पूर्व पश्चिम पट्टा सक्रिय आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पाऊस सुरू असून, उस्मानाबाद, बीड, लातूर, नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २७) उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सून परतीसाठी पोषक हवामान

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू केला असून, मंगळवारी (ता. २०) राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर, आणि गुजरातच्या नालिया पर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला आहे.

त्यानंतर परतीच्या प्रवासात कोणतीही वाटचाल झालेली नसून, सोमवारी (ता. २६) मॉन्सूनच्या परतीची सीमा कायम होती. परतीसाठी पोषक हवामान झाल्याने येत्या दोन ते तीन दिवसांत वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागातून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता आहे.

मंगळवारी (ता.२७) राज्यातील पावसाचा इशारा (सौजन्य : हवामान विभाग) :

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : धुळे, जळगाव.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली.

सोमवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : अंबरनाथ ४०, पोलादपूर ३०, माथेरान २०, रत्नागिरी, उल्हासनगर, खालापूर, वाकवली, संगमेश्वर, भिवंडी, विक्रमगड प्रत्येकी १०.

मध्य महाराष्ट्र :

पारनेर, कर्जत प्रत्येकी ५०, मोहोळ ३०, शिरूर २०, करमाळा, जामखेड, निफाड, महाबळेश्वर, जत, वेल्हे प्रत्येकी १०.

मराठवाडा : पाटोदा, तुळजापूर प्रत्येकी ८०, निलंगा ७०, आष्टी ६०, उस्मानाबाद ५०, भूम ३०, केज २०, रेणापूर, शिरूर कासार, देवणी, उमरगा प्रत्येकी १०.

विदर्भ : सालकेसा, तुमसर, पोंबुर्णा, गोरेगाव, गोंदिया, देवरी प्रत्येकी १०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Sales : फेब्रुवारी महिन्यात ट्रॅक्टरच्या विक्रीत ३४ टक्के वाढ; खरेदीला पसंती का?

Farmer Justice: अखेर अपघातग्रस्त ट्रॅक्टर शेतकरी कुटुंबाला मिळाला परत!

Agriculture Success Story: बचत गट ते शेतकरी उत्पादक कंपनी

Cotton Bag Scam: कापूस पिशव्यांच्या खरेदीत गैरव्यवहार, चौकशी अहवाल कृषी आयुक्तालयास सादर

Farm Pond: शेततळ्यांसाठीचे १७ हजारांवर अर्ज रद्द

SCROLL FOR NEXT