Cloudy Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cloudy Weather : ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

हवामान बदलामुळे येत्या काही दिवसांत पालघरमध्ये ढगाळ वातावरण असणार असून ४ ते ६ मार्च या कालावधीत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Team Agrowon

Climate Change News पालघर : हवामान बदलामुळे (Climate Change) येत्या काही दिवसांत पालघरमध्ये ढगाळ वातावरण (Cloudy Weather) असणार असून ४ ते ६ मार्च या कालावधीत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Department) वर्तवली आहे. याचा परिणाम हरभरा, वाल व चवळी या पिकांवर होणार असल्याने जिल्ह्यातील शेतऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या अंदाजानुसार ४ ते ६ मार्च पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यात ४ ते ६ मार्चदरम्यान अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, अशी माहिती कोसबाड येथील जिल्हा कृषी हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली.

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी अवस्थेत असलेल्या हरभरा, वाल व चवळी या रब्बी पिकांची शेतकऱ्यांनी पुढील दोन दिवसांत काढणी करून घ्यावी, कमाल तापमान जास्त असल्याने कडधान्य पिकाच्या शेंगा तडकू शकतात.

त्यामुळे पिकांची काढणी सकाळच्या वेळेस करावी. त्याबरोबर परिपक्व झालेला भाजीपाला व फळांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. तापमानात वाढ होत असल्याने जनावरे व कोंबड्यांचे वाढत्या उष्णतेपासून संरक्षण करण्याचा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी दिला आहे.

विक्रमगडवासी उष्णतावाढीने हैराण

विक्रमगड : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. अशात विक्रमगड तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून दुपारच्या वेळेत तापमानाचा पारा अधिक वाढत चालला आहे. सध्या शीतपेयांची, आईस्क्रीमची मागणीही वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT