Pune News : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे जिल्ह्यात दमदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी हलक्या सरी सर्वदूर पडत आहेत. बुधवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात २४.६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. या पावसामुळे विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत काहीशी वाढ झाली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी (ता.२६) दुपारपासून पावसाने जोर लावून धरला आहे. बुधवारीही (ता.२७) सकाळपासून पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे भात, तूर पिके चांगलीच तरारली असून पिकांची वाढ चांगली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला असून रब्बी हंगामासाठी हा पाऊस पोषक असल्याने दिलासा मिळत आहे. असाच पाऊस येते काही दिवस राहिल्यास रब्बी हंगामातील पेरण्या वेळेवर होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. तर, अनेक शेतकऱ्यांना अजूनही सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
सध्या पावसाच्या जोरदार सरी बरसत आहे. दौंडमधील वरवंड येथे सर्वाधिक ७६.५ मिलिमीटर पाऊस पडला. आत्तापर्यंत पूर्वेकडील शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर तालुक्यांत पाऊस नसल्याने पिके अक्षरशः वाया गेली आहेत. या सर्वच तालुक्यांत जोरदार पाऊस पडत आहे. पाटसमध्ये ४८.५ मिलिमीटर, तर पारगाव ४५.३ मिलिमीटर पाऊस पडला. बारामतीतील सुपा येथे सर्वाधिक ७३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. इतर भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पुरंदरमध्ये पावसाचे प्रमाण कमी असले तरी हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. शिरूरमध्येही वडगाव, न्हावरा येथे ७२.५ मिलिमीटर पाऊस पडला. दुष्काळी भागात पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
बुधवारी (ता.२७) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडलनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
- हवेली - पुणे वेधशाळा ३४.३, केशवनगर ३४.३, कोथरूड २०.३, खडकवासला ५४, थेऊर ३०.५, उरुळीकांचन १९.८, खेड २१, भोसरी ६७, चिंचवड ५७, कळस ३२, हडपसर ८, वाघोली २४, अष्टापूर १२.८,
- मुळशी - पौड ६८.३, घोटावडे ६८.३, थेरगाव ४३, माले ३६.८, मुठे ६८.८, पिरंगुट २९
- भोर - भोर १९.३, भोलावडे ५१.८, नसरापूर २४.३, किकवी ५, वेळू २४.५, आंबवडे २२.८, संगमनेर ३७, निगुडघर ३५.३
- मावळ - वडगाव मावळ २८.८, तळेगाव २५.५, काले ३१.३, कार्ला ४३.८, खडकाळा ९.८, लोणावळा १८.८, शिवणे ३४
- वेल्हा - वेल्हा ८.८, पानशेत ३७, विंझर २७.८, आंबवणे २४.३
- जुन्नर - जुन्नर १०, नारायणगाव ४.५, वडगाव आनंद १.३, निमगाव सावा, बेल्हा ४.८, राजूर८.५, डिंगोरे ७.५, आपटाळे ६.५, ओतूर ३.३
- खेड - वाडा ६.५, राजगुरुनगर २६.८, कुडे २.८, पाईट १७.३, चाकण ६१.८, आळंदी ६७, पिंपळगाव २६.८, कन्हेरसर ३३, कडुस २६
- आंबेगाव - घोडेगाव ४.५, आंबेगाव ६८.८, कळंब, पारगाव ३.८, मंचर ५.८
- शिरूर - टाकळी हाजी ३.५, वडगाव, न्हावरा ७२.५, मलठण ४.८, तळेगाव १०, रांजणगाव २४.३, कोरेगाव ५.०, पाबळ ३३, शिरूर ४.०
- बारामती - बारामती ३.३, माळेगाव ४.५, पणदरे ५.५, वडगाव १०.३, लोणी २१.३, मोरगाव ९.३, उंडवडी ६.८
- इंदापूर - भिगवण ११.८, इंदापूर १३.३, लोणी १०.८, बावडा ७.०, काटी ४.०, निमगाव ८.०, अंथुर्णी ११.०, सणसर २.५
- दौंड - देऊळगाव २७, यवत २०.५, कडेगाव २६.०, राहू १९.५, रावणगाव ११.८, दौंड ३५.३, बोरीभडक २५.५, खामगाव १९.८, वडगाव भांडे १३.८, बोरीपार्धी २८.३,
- पुरंदर - सासवड २९.५, भिवंडी १५.३, कुंभारवळण २४.८, जेजुरी १०, परिंचे १७.३, राजेवाडी २६.८, वाल्हा ११
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.