Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविमा कंपनी विरोधात शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

जिल्ह्यात २४ महसूल मंडलांतील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम पीक विमा रक्कम देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला विमा कंपनीने नकार दिला असून, त्यासाठी महसूल विभागाने पिकोत्पादन अहवाल सादर करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी मागणी येथील जनमंच, प्रगती शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली.

Team Agrowon

मूर्तिजापूर, जि. अकोला : जिल्ह्यात २४ महसूल मंडलांतील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम पीक विमा रक्कम (Crop Insurance) देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला विमा कंपनीने नकार दिला असून, त्यासाठी महसूल विभागाने पिकोत्पादन अहवाल सादर करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी मागणी येथील जनमंच, प्रगती शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत कृषिमंत्र्यांना निवेदन पाठवत एल्गार पुकारला आहे.

यंदाच्या हंगामात पिकांचे नुकसान झाल्याने जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी पंतप्रधान पीकविम्यात जोखमीच्या बाबीअंतर्गत नुकसान भरपाई निश्‍चित करीत विमा काढलेल्या उत्पादकांना संभाव्य नुकसान भरपाई रकमेपैकी २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याबाबत आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीला निर्देशित केले होते.

अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत सोयाबीन पिकांसाठी पात्र महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत सोयाबीन पिकांसाठी पात्र महसूल मंडळातील विमा धारकांना मदत द्यावी असेही निर्देश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश कंपनी झुगारून लावत असेल, तर कंपनीच्या विरोधात प्रगती शेतकरी मंडळ, जनमंच, स्वाभिमानी शेतकरी संघटना, न्यू यंग क्लब फार्मस ग्रुप यांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला. राजू वानखडे, प्रा. सुधाकर गौरखेडे, कृष्णराव गावंडे, प्राचार्य श्रावण रणबावळे, सेवकराम लहाने, इतर शेतकऱ्यांनी इशारा दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT