Farmer Loan Waive Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Incentive Scheme : प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत पुढील याद्यांची प्रतिक्षेत शेतकरी

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत जाहीर झालेल्या पहिल्या यादीनुसार पात्र परभणी जिल्ह्यातील ८ हजार २५९ शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची २५ कोटी ७२ लाख रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे.

Team Agrowon

परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती (Mahatma Jyotirao Phule Farmer Loan Waiver) योजनेअंतर्गत नियमित कर्ज (Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmer) प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत जाहीर झालेल्या पहिल्या यादीनुसार पात्र परभणी जिल्ह्यातील ८ हजार २५९ शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची २५ कोटी ७२ लाख रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे. परंतु, त्यापुढील याद्या जाहीर झाल्या नसल्याने पात्र शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे.

प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षात घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षांच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपये पर्यंत लाभ दिले जात आहे. या तीन वर्षांपैकी शेवटच्या वर्षात कर्ज घेतलेले आहे. त्या वर्षाच्या कर्जाची मुद्दल रक्कम विचारात घेतली जाणार आहे.

या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील विविध १६ बँकांच्या ३६ हजार ५७८ शेतकरी खातेदारांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. विशिष्ट क्रमांकासह ९ हजार ७४१ लाभार्थींची पहिली यादी पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे. बँकस्तरावर संबंधित शाखा तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, यांचे कार्यालय, , गावपातळीवर ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रसिद्ध केली.

मंगळवार (ता. २२) पर्यंत ९ हजार ३५३ कर्जखात्यांचे संबंधित शेतकऱ्यांनी आधारप्रमाणिकरण करून घेतले आहे. अद्याप ३८८ कर्जखात्यांचे आधारप्रमाणिकरण बाकी होते. या अंतर्गत १४१ कर्जखात्याबद्दल तक्रारी प्राप्त आहेत. त्यापैकी ९९ तक्रारी जिल्हास्तरीय समितीस्तरावर प्रलंबित आहेत. ८ तक्रारींचे तालुकास्तरावर निवारण करण्यात आले तर ३४ तक्रारी प्रलंबित आहेत.

या अंतर्गत पहिल्या यादीतील आधारप्रमाणिकरण करून घेतलेल्या पात्र ८ हजार २५९ शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची २५ कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींची विशिष्ट क्रमांकासह पहिली यादी पोर्टलवर प्रसिद्ध होऊन महिनाभराहून अधिक कालावधी उलटला आहे. परंतु त्यापुढील याद्या प्रसिद्ध झालेल्या नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing: कपाशीची ८ हजार ६७१ हेक्टर लागवड उगवण संकटात

Kharif Sowing Issues: पुसद तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

Vidarbha Water Crisis: विदर्भावर जलसंकटाचे सावट

Ahilyanagar Politics: पंचवीस टक्के ताकद वापरली तरी आमदार पाडू शकतो

Sugarcane Price: विलास साखर कारखान्याकडून उसाला ३,१७१ रुपये दर

SCROLL FOR NEXT