Uday Samant  Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Compensation : नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

Latest Agriculture News : ज्‍या शेतकऱ्यांच्या जमिनीतून ही गॅसवाहिनी गेली आहे, त्‍यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.

Team Agrowon

Agriculture News : कर्जत तालुक्यात सुमारे २६ किलोमीटर लांबीची मिथेन गॅसवाहिनी टाकण्यात आली आहे. ज्‍या शेतकऱ्यांच्या जमिनीतून ही गॅसवाहिनी गेली आहे, त्‍यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. तर काही ठिकाणी जागा एकाच्या नावावर असताना पैसे दुसऱ्यालाच मिळाले आहेत.

पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी याप्रकरणी लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात नुकतीच रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.

यावेळी सकारात्‍मक प्रतिसाद देत सामंत यांनी शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याचे सांगून दोषींवर कारवाई करणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. शेतकऱ्यांना न्यायासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली २६ जानेवारी २०२१ रोजी आवसरे येथे रस्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते.

गुन्हे दाखल करण्याचे आदेश

गॅसवाहिनी बाधित शेतकऱ्यांनी अडचणी मांडल्या असता, संबंधित अधिकाऱ्यांना उदय सामंत यांनी धारेवर धरले. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, गॅसवाहिनी टाकताना कंपनीकडून नियमांचे उल्‍लंघन झाल्‍यास चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांमध्ये अहवाल सादर करावा, असे आदेश उदय सामंत यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT